यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:33+5:302021-05-13T04:34:33+5:30
जिल्हाभर १० दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे ११ मे रोजी चैत्र अमावास्येला भरणारी यात्रा प्रशासनाच्या नियमामुळे रद्द करण्यात आली. ...
जिल्हाभर १० दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे ११ मे रोजी चैत्र अमावास्येला भरणारी यात्रा प्रशासनाच्या नियमामुळे रद्द करण्यात आली. या यात्रेला ७० वर्षांची जुनी परंपरा असून गावात श्री औंढेश्वर भगवान यांचे ऐतिहासिक मंदिर आहे. या यात्रा महाेत्सवात परिसरातील शेकडाे भाविक सहभागी हाेत असतात़
दुखणे अंगावर काढू नका
देऊळगाव राजा : तालुक्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सर्दी, खोकला, ताप अंगदुखी असे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी लक्षणे अंगावर काढू नये, असे आवाहन तहसीलदारांनी केले.
महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद अवस्थेत
बुलडाणा : शहराला लागून असलेल्या कोलवड ग्रामपंचायतीच्या नळ योजनेच्या विहिरीवरील विद्युत पुरवठा एका महिन्यापासून खंडित करण्यात आला आहे. तब्बल महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी
बुलडाणा : शासन व प्रशासनाने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय हा चुकीचा नसून तो योग्यच आहे. परंतु या निर्णयात दुकानदार, व्यापारी वर्गाचा कुठलाच विचार करण्यात आला नाही. त्यामुळे व्यावसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे.
बुलडाण्यातील रक्तपेढ्या ऑक्सिजनवर, साठा मर्यादित
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. लसीकरणानंतर तत्काळ रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी सह इतरही रक्तपेढ्यांमध्ये मर्यादितच साठा असल्याने रक्तपेढ्या ऑक्सिजनवर असल्याचे चित्र आहे.
उन्हाळी शिबिराला कोरोनाचा फटका
बुलडाणा : एप्रिल किंवा मे मध्ये १० ते १५ दिवसांचे मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये झुंबा डान्स, संगीत, कला, खेळ तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
वाढत्या तापमानाचा पक्ष्यांवर परिणाम
बिबी : वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मानवा बरोबरच पक्ष्यांनाही याचा फटका बसत आहे. पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने व उष्माघातामुळे अनेक पक्षी मृत्यूमुखी पडण्याचा धोका वाढतो.
शाळा बंद, स्कूल बस तपासणीकडे दुर्लक्ष
बुलडाणा : स्कूलबसची तपासणी न केल्यास आरटीओकडून परवाना निलंबित करण्यात येतो. बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूलबसची आरटीओकडून होणाऱ्या फेर तपासणीकडे स्कूलबसच्या चालकांनी दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्यात महिन्याला पाच हजार सिटीस्कॅन
बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी चार ते पाच हजारावर सिटीस्कॅन केले जात आहेत. मात्र, शासकीय दराऐवजी मनमानी पद्धतीने सिटीस्कॅन दराची आकारणी केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहेे. रुग्णांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़
ऑक्सिजनचे मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन
बुलडाणा : जिल्ह्यात एकूण ऑक्सिजनचे मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे. जिल्ह्यासाठी मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा अकोला व जालना येथून निरंतर सुरु ठेवण्यात आला आहे.