प्रचाराला सहा जण आल्यास दारात उभे करू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:59 AM2021-01-13T11:59:51+5:302021-01-13T12:00:01+5:30
Gram Panchayat Election News ग्रामीण भागात प्रचारादरम्यान नियमांना खाे देण्यात येत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्यात आला असून, काेराेना संसर्ग पाहता प्रशासनाने प्रचारासाठी उमेदवारांसह पाच लाेकांनाच परवानगी दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रचारादरम्यान नियमांना खाे देण्यात येत असल्याचे चित्र आहे. काही गावांमध्ये तर चक्क रॅली काढण्यात येत आहे. त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक हाेत आहे. २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने ४९८ ग्रामंपचायतींसाठी १५ जानेवारी राेजी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे्. सध्या उमेदवारांचा प्रचार जाेरात सुरू आहे. या प्रचारादरम्यान काेराेनाविषयक नियमांना मात्र खाे देण्यात येत असल्याचे चित्र आहे.
उमेदवारांसह पाच जणांनाच प्रचारास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील डाेणगाव, बिबी, अमडापूर, हिवरा आश्रम येथील अनेक उमेदवार पाच पेक्षा जास्त लाेकांना साेबत घेउन प्रचार करीत असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये समाेर आले आहे. काेराेना रुग्णांची संख्या कमी पझाल्याने गांभीर्य राहले नसल्याचे चित्र आहे. काेराेनाविषय नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार तालुकास्तरावरील समित्यांना आहे. तक्रार झाल्यास या समित्या कारवाइ करतात.
डाेणगाव
मेहकर तालुक्यातील माेठी ग्रामपंचायत असलेल्या डाेणगाव पाच ते सहा कार्यकर्ते घेउन काही उमेदवार प्रचार करीत आहेत. काही उमेदवार तर चक्क रॅली काढून प्रचार करीत असल्याचे चित्र आहे.
बिबी
लाेणार तालुक्यातील बिबी येथेही काही उमेदवार काेराेनाविषयक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. अनेक जण मास्कही लावत नसल्याचे चित्र आहे. अनेकांना नियमाविषयी माहितीच नाही.
अमडापूर
चिखली तालुक्यातील अमडापूर येथे उमेदवारांच्या प्रचाराचा जाेर वाढला आहे. उमेदवारांसह पाच जणांना प्रचाराची परवानगी असली तरी काही जण यापेक्षा जास्त लाेकांना धेउन प्रचार करीत असल्याचे चित्र आहे.
प्रचार करण्यासाठी उमेदवारांसह पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारांनी या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहेत. काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकारी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समित्यांना आहेत. पथकेही नेमली आहेत. तक्रारी आल्यास कारवाई हाेईल.
- दिनेश गिते ,
निवासी उपजिल्हाधिकारी