कंडारी-भंडारी येथील तलावात बेकायदेशीर मासेमारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:59 PM2020-08-07T17:59:45+5:302020-08-07T18:00:05+5:30
कंडारी-भंडारी येथील तलावात चक्क रात्रीच्यावेळी नियमबाह्यपध्दतीने मासेमारी केल्या जात आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : रात्रीच्यावेळी मासेमारीला पूर्णत: बंदी आहे. मात्र, खामगाव तालुक्यातील कंडारी-भंडारी येथील तलावात चक्क रात्रीच्यावेळी नियमबाह्यपध्दतीने मासेमारी केल्या जात आहे. हा धक्कादायक प्रकार गत कित्येक दिवसांपासून सुरू आहे.
कंडारी-भंडारी येथील तलावातील मासेमारीसाठी पूजा मासेमारी सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आला आहे. हा कंत्राट देत असताना स्थानिकांना डावलण्यात आल्याची तक्रार कंडारी-भंडारी ता. खामगाव येथील राजेंद्र मत्स्यव्यवसाय सह. संस्थेचे सचिव राजेश श्रावण सोनारे यांनी केली आहे. या अन्यायाबाबत राजेंद्र मत्स्यव्यवसाय सह. संस्थेने रिव्हिजन पिटीशन दाखल केले आहे. तसेच स्थगिती अर्ज देखील दाखल केला आहे. दरम्यान, या तलावातून रात्रीच्यावेळी कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तीकडून बेकायदेशीररित्या मासेमारी केल्या जात आहे. याबाबत या संस्थेला समज देण्यात आल्यानंतरही ७ आॅगस्टच्या रात्री २: ३० वाजता पुन्हा रात्रीच्यावेळी मासेमारी करण्यात आली. यासंदर्भात उपसंचालक मत्स्यव्यवसाय विभाग, अमरावती यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सहा.आयुक्त बुलडाणा यांना चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
स्थानिकांना धमक्या!
कंडारी-भंडारी धरणात बेकायदेशीर मासेमारी करणाºयांना हटकले असता, वरिष्ठ अधिकाºयांच्या मर्जीनुसारच मासेमारी करीत असल्याची धमकी यावेळी स्थानिकांना देण्यात आली. यासंदर्भात सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय, बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली.