खामगावात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 01:15 PM2020-08-07T13:15:18+5:302020-08-07T13:15:25+5:30
स्थानिक एमआयडीसी परिसरात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक एमआयडीसी परिसरात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटील आणि अन्न व प्रशासन यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने एमआयडीसी परिसरात शुक्रवारी पहाटे छापा टाकला. त्यावेळी शासनाने प्रतिबंध केलेला आणि मानवी आरोग्यास घातक असलेला ४६ पोते आणि १८ कट्ट्यांमध्ये असलेला ३४ लक्ष रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली असून या प्रकरणी राजू श्याम गवांदे रा. शंकर नगर खामगांव यास अटक करण्यात आली. तसेच अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या फिर्यादि वरून आरोपी विरुध्द भादंवि कलम १८८, २६०, २७०, २७२, २७३, ३२८, ३४ भादंवि सह कलम २६ (२),(५),59(१)अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशाने, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली एस.डी.पी.ओ. प्रदीप पाटील खामगांव यांच्यासह पथकातील स.पो.नि. रविंद्र लांडे, पो.ना. सुधाकर धोरात, पो.ना. अमित चंदेल तसेच अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे (सहायक आयुक्त) अकोला, ग.वा. गोरे अन्न सुरक्षा अधिकारी बुलडाणा यांनी केली आहे.