अवैध रेती वाहतुकीला लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:14+5:302021-04-15T04:32:14+5:30
देऊळगावमही : रेती माफियांसाठी कर्दनकाळ ठरलेले मंडळ अधिकारी रवींद्र काकडे हे पुन्हा देऊळगाव मही येथे रुजू झाले आहेत़ त्यामुळे ...
देऊळगावमही : रेती माफियांसाठी कर्दनकाळ ठरलेले मंडळ अधिकारी रवींद्र काकडे हे पुन्हा देऊळगाव मही येथे रुजू झाले आहेत़ त्यामुळे परिसरातील अवैध रेती वाहतुकीला ब्रेक लागला आहे़
देऊळगाव राजा तहसील अंतर्गत एकूण पाच महसूल मंडळे येतात़ त्यापैकी देऊळगाव मही महसूल मंडळाचे मंडळ रवींद्र काकडे यांची डिसेंबर २०२०मध्ये प्रशासकीय कारणास्तव भूसंपादन विभाग बुलडाणा येथे बदली करण्यात आली हाेती़ तब्बल तीन महिन्यानंतर काकडे यांची देऊळगाव महीचे मंडळ अधिकारी म्हणून १ एप्रिल २०२१ रोजीच्या जिल्हाधिकारी यांच्या पत्राऩे पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे़ या महसूल मंडळा अंतर्गत खडकपूर्णा नदी येत असून डिग्रस बु., नारायणखेड, निमगाव गुरु, टाकरखेड भागिले असे रेतीघाट येतात़ या रेती घाटांमधून अहोरात्र अवैधरीत्या रेती माफियांचा अवैध रेती उपसा सुरू हाेता़, तसेच शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत हाेता. या मंडळात काकडे यांची पुन्हा नियुक्ती झाल्याने रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. गेल्या वर्षभरात मंडळ अधिकारी काकडे यांनी मोठ्या प्रमाणात अवैध रेती माफियांवर कारवाया करून प्रत्येकाला लाखो रुपयांचा दंड आकारला हाेता़ अवैध रेती माफियांवर कारवाईमुळे रवींद्र काकडे यांच्यावर हल्ले झालेही झाले आहेत़ त्याला न जुमानता त्यांनी रेती माफियांवर माेठ्या प्रमाणात कारवाई केली हाेती़ आता पुन्हा त्यांची देऊळगाव मही येथे बदली झाल्याने रेती माफियांनी रेतीची अवैध वाहतूक थांबवल्याचे चित्र आहे़