देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात तातडीने पन्नास खाटाचे कोविड सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:43+5:302021-04-28T04:37:43+5:30
कोविडचा संसर्ग सध्या वाढत आहे. वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येत असून कोविडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मृत्यूचे ...
कोविडचा संसर्ग सध्या वाढत आहे. वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येत असून कोविडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. विशेषत: कोविडचा संसर्ग सध्या वाढत आहे. वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येत असून कोविडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. परिसरात दररोज शेकडो रुग्णांची वाढ होत आहे. शासकीय कोविड सेंटर आणि खासगी दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रुग्णांचे हे वाढते प्रमाण लक्षात घेता लोकांना जीव वाचवण्यासाठी बेडची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. मागील काही दिवसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या रुग्णांची संख्या खूप वाढली आहे. रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी ग्रामीण रुग्णालयातील इमारतीमध्ये पन्नास खाटांचे सेंटर त्वरित उभारावे, अशी मागणी रियाज खा पठाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायपुरे व अन्य मंडळी उपस्थित होती.