संचारबंदीची अंमलबजावणी, डाेणगावात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:43+5:302021-04-20T04:35:43+5:30
डाेणगाव हे गाव राज्य महामार्गावर असून, येथून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांबरोबर शेकडो वाहने धावतात. याचाच फायदा घेत बसस्थानक ...
डाेणगाव हे गाव राज्य महामार्गावर असून, येथून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांबरोबर शेकडो वाहने धावतात. याचाच फायदा घेत बसस्थानक परिसरात व आठवडी बाजारात असणारे व्यापारी हे आपल्या दुकानासमोर बसून आपला व्यवसाय चोरी चोरी छुपके करीत आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होऊन कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामपंचायत व महसूल विभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने अखेर डोणगांवचे ठाणेदार दीपक पवार व पोलीस कर्मचारी हे ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी सर्व गावकऱ्यांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत देताच डोणगांव येथे शुकशुकाट पहायला मिळाला. डोणगांव येथून सर्रास परजिल्हयात ओव्हर लोड रेती वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे.