मोबाईल व्हॅन फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:45 PM2019-11-17T15:45:24+5:302019-11-17T15:45:31+5:30
रवंड येथे १८ नोव्हेंबर तर देऊळघाट येथे १९ नोव्हेंबर रोजी हे मोबाईल व्हॅन फिरते न्यायालय जाणार आहे.
बुलडाणा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे मोबाईल व्हॅन फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश महेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती (नागपूर खंडपीठ) यांच्या आदेशान्वये हा कार्यक्रम पार पडला.
जिल्हा न्यायाधिश-१ सी. आर. हंकारे, जिल्हा न्यायाधिश-२, ए. ए. धुमने, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव साजिद आरिफ सैय्यद, दिवाणी न्यायाधीय आर.एम.राठोड, मुख्य न्यायदंडाधिकारी एन. आर. तळेकर, सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर एस. डी. पंजवाणी, २ रे सह दिवाणी न्यायाधिश एस. एम. पडोळीकर, सह दिवाणी न्यायाधिश क स्तर ए. ए. देशपांडे, आणि ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर ए. बी. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.के.महाजन यांनी सकाळी साडेदहा वाजता हिरवी झेंडी देऊन फिरते लोकन्यायालयाला सुरूवात करण्यात आली. ही संकल्पना प्रत्येक गावाच्या दारापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया राबविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यन्वित होत असल्यामुळे संबंधित गावातील लोकांनी आपापल्या प्रकरणात या फिरत्या लोक न्यायालयासमोर आपल्या प्रकरणात तडजोड करावी. सदर फिरते लोकन्यायालय १६ नोव्हेंबर रोजी धाड येथे दाखल झाले होते. वरवंड येथे १८ नोव्हेंबर तर देऊळघाट येथे १९ नोव्हेंबर रोजी हे मोबाईल व्हॅन फिरते न्यायालय जाणार आहे. या संधीचा नागरिकांनी फायदा घ्यावा असे त्यांनी आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने करण्यात आले आहे.