डोणगाव येथे वाढले अतिक्रमणातील बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:12+5:302021-07-28T04:36:12+5:30
डोणगाव येथे काही ठिकाणी एक मजली, तर काही ठिकाणी २ मजली दुकानाचे पक्के बांधकाम झालेले आहे. नावावर जागा किती ...
डोणगाव येथे काही ठिकाणी एक मजली, तर काही ठिकाणी २ मजली दुकानाचे पक्के बांधकाम झालेले आहे. नावावर जागा किती आणि बांधकाम किती जागेवर हा प्रश्न निर्माण होत आहे. औरंगाबाद, नागपूर राज्य महामार्गावर स्थित गावात जाणाऱ्या मेनरोडवर सध्या दिवसाढवळ्या बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम ताब्यात असलेल्या जागेपेक्षा जास्त अतिक्रमण करून होत असल्याची तक्रार अमोल नत्थुजी वाघमारे यांनी २६ जुलै रोजी गटविकास अधिकारी मेहकर व तहसीलदार मेहकर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित बांधकाम त्वरित थांबवून जागा अतिक्रमित आहे की मालकीची आहे याचा पुरावा पाहिल्या शिवाय बांधकाम करू देऊ नये, असेही तक्रारीत नमूद आहे.
ग्रामपंचायतीसमोरील दुकानाचे छत पाडले
डोणगाव येथील ग्रामपंचायतीसमोर असलेल्या एका दुकानाचे विना परवाना टाकलेले स्लॅब ग्रामविकास अधिकारी यांनी पाडून टाकले होते. अशात हे सुद्धा अवैध बांधकाम पाडण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. २२ जुलै रोजी सुद्धा एक निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठलीच कारवाई झाली नाही.