कडक निर्बंधात घरपोच सिलिंडर; पण डिलिव्हरी बॉयचे लसीकरण केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:02+5:302021-06-02T04:26:02+5:30

बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधातही गॅस सिलिंडरचे घरपाेच वितरण सुरू आहे़ मात्र, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला लसीकरणात ...

Indoor cylinders under strict restrictions; But when is the delivery boy vaccinated? | कडक निर्बंधात घरपोच सिलिंडर; पण डिलिव्हरी बॉयचे लसीकरण केव्हा?

कडक निर्बंधात घरपोच सिलिंडर; पण डिलिव्हरी बॉयचे लसीकरण केव्हा?

Next

बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधातही गॅस सिलिंडरचे घरपाेच वितरण सुरू आहे़ मात्र, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला लसीकरणात प्राधान्य नसल्याने, कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. डिलिव्हरी बाॅयसह एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़

संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. दरम्यान, कोरोनाकाळात तसेच कडक निर्बंधाच्या काळात घरपोच गॅस सिलिंडर पोहचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मात्र लसीकरणात प्राधान्य देण्यात आले नाही. जिवावर उदार होऊन डिलिव्हरी बॉय घरपोच सेवा देत असल्याने त्यांना लसीकरणात प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. बुलडाणा शहरात ५२ हजारांच्या आसपास गॅस सिलिंडर जोडणी आहेत. कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात यावा, असा सूर उमटत आहे. घरपाेच गॅस सिलिंडर पाेहोचणाऱ्यांसह एजन्सीमध्ये काम करणाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़

सिलिंडर सॅनिटाइज केले का?

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सिलिंडर घरात नेण्यापूर्वी सॅनिटाइज करणे आवश्यक आहे. सॅनिटाइज केल्याशिवाय सिलिंडरला हात लावू नये. लहान मुलांना सिलिंडरपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. पूर्णपणे सॅनिटाइज केल्यानंतरच घरात सिलिंडर न्यावे. सिलिंडर घेताना ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे़

१० ते १२ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह

कोरोनाकाळात घरपोच सेवा देताना आवश्यक ती खबरदारी डिलिव्हरी बॉयकडून घेण्यात येते. तथापि, दुसऱ्या लाटेत बुलडाणा शहरातील १० ते १२ डिलिव्हरी बॉयला कोरोना संसर्ग झाला. सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी कोरोनावर सहज मात केली. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. त्यामुळे लसीकरणात प्राधान्य द्यावे, असा सूर उमटत आहे. डिलिव्हरी बाॅयचा लाेकांशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्याने त्यांचे लसीकरण आवश्यक आहे़

कोरोनाकाळातही घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविण्यात येत आहे. प्रत्येक ग्राहकाशी जवळून संपर्क येत असला तरी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते. लसीकरण झाले तर अतिउत्तम ठरेल. काही जणांना अद्याप पहिला डोसही मिळाला नाही.

- रवी शेळके, डिलिव्हरी बॉय

कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, डिलिव्हरी बॉयला यामध्ये प्राधान्य नाही. घरपोच सेवा दिली जात असल्याने लसीकरणात प्राधान्य असावे. पहिला डोस मिळल्यानंतर दुसरा डोस मिळण्यास विलंब होत आहे.

- उदय माेरे, डिलिव्हरी बॉय

शहरी व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आम्ही तर घरपोच सेवा देत असतानाही लसीकरणात प्राधान्य नाही. त्यामुळे लसीकरण झाले नाही. गॅस सिलिंडर घरपोच पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉय, चालकांना लसीकरणात प्राधान्य द्यावे. आमच्या वतीने आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. ग्राहकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.

-राजू इंगळे, डिलिव्हरी बॉय

Web Title: Indoor cylinders under strict restrictions; But when is the delivery boy vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.