कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:12 AM2017-09-27T00:12:42+5:302017-09-27T00:12:49+5:30

हिवरा आश्रम: मेहकर उप विभागांतर्गत येणार्‍या ३८ हजार ३१३  हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. याबाबत अनेक शेतकरी तक्रार करीत असून,  क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

Inflammation of scaly bundle on cotton crop | कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव

कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देक्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शनअळय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: मेहकर उप विभागांतर्गत येणार्‍या ३८ हजार ३१३  हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. याबाबत अनेक शेतकरी तक्रार करीत असून,  क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
मेहकर उप विभागांतर्गत मेहकर - ७८0, लोणार - १0१९,  सिंदखेडराजा- १७३३८, देऊळगावराजा - १९१७६ असे एकूण  ३८३१३ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झालेली असून,  पीक फुलोरा व बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे; परंतु  िपकावर प्रामुख्याने ठिपक्याची बोंडआळी, हिरवी बोंडअळी,  शेंदरी बोंडअळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प  सन २0१७-१८ अंतर्गत पिकाची पाहणी करण्यात येत असून,  सिंदखेडराजा तालुक्यातील कापूस पिकावर सध्या शेंदरी  बोंडआळीचा प्रादुर्भाव दिसून  येत आहे.  शेंदरी बोंडअळीचा प तंग लहान असून, तो गर्द बदामी रंगाचा असतो आणि पंखावर  बारीक काळे ठिपके असतात. अंड्यातून बाहेर आलेली अळी  प्राथमिक अवस्थेत पांढर्‍या रंगाची असून, डोके तपाकिरी रंगाचे  असते. पूर्ण वाढ झालेली अळी ११ ते १३ मिमी लांब व गुलाबी  रंगाची दिसते. सुरुवातीला अळ्या पाते, कळ्या व फुलावर उ पजीविका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या  गुलाबी कळीसारख्या दिसतात. अशा कळ्यांना डोमकळी म्हण तात. प्रादुर्भावग्रस्त पाते व बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न  होताच फुटतात. बोंडातील अळ्या रुइमधून छिद्र करून सरकी  खातात. त्यामुळे रुईची प्रत खालावते, अशी माहिती सुधाकर  कंकाळ कीड नियंत्रक मेहकर यांनी दिली. 

अळय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करा
शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी  अर्काची फवारणी करावी किंवा बिव्हेरिया बसियाना किंवा  मेटारायझियम अनिसोप्ली १.५ टक्के विद्राव्य घटक असलेली  भुकटी (२.५ किलो प्रती हेक्टर) ४0 ग्रॅम प्रती १0 लीटर पाण्या त मिसळून वातावरणात आद्र्रता असताना फवारणी करावी.  किडीने आर्थिक नुकसान पातळी (५-१0 टक्के कीडग्रस्त पा त्या, फुले, बोंडे ) ओलांडल्यास  क्विनॉलफॉस २५ ईसी. २0  मिली किंवा प्रोफेनोफॉस ५0 ई.सी. २0 मिली किंवा थायोडीकार्ब  ७५ डब्लूपी २0 ग्रॅम किंवा  लॅमडा सायहॅलोथ्रिन ५ ई.सी.१0  मिली किंवा सायपरमेथ्रीन १0 ई.सी. १0 मिली प्रती १0 लीटर  पण्यात मिसळून फवारणी करावी. वरील मात्रा साध्या पंपासाठी  असून, पेट्रोल पॉवर स्प्रे पंपासाठी हे प्रमाण तिप्पट करावे, अशी  माहिती उपविभागीय कृषी अधिकारी गणेश गिरी यांनी दिली.

Web Title: Inflammation of scaly bundle on cotton crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.