देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मका पिकावर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.दरवर्षीच्या मानाने यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर मका लागवड केली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते. यावर्षी सुरूवातीलाच भरपूर पाऊस पडल्याने मका वाढलेही परंतु सध्या या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. खामगाव तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामाच्या नियोजनानुसार ५०० हेक्टरवर मका लागवड करण्यात आली आहे. परंतु सध्या लष्करी अळीने आक्रमण केले असल्याने पिक हातून जायची वेळ आली आहे.दरम्यान याबाबत तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांच्याशी संपर्क केला असता, खामगाव तालुक्यात लष्करी अळीचा सध्या फारसा प्रादुर्भाव झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमधील मका पिकात लष्करी अळी आढळून आली आहे. यासाठी कृषी कर्मचाºयांकडून लवकरच नियोजन करून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान मक्यावर आलेली लष्करी अळी नियंत्रणात आणण्यासाठी रासायनिक किटनाशकांचा वापर तज्ञांच्या मार्गदर्शनात करावा, असे आवाहन कृषी तज्ञांकडून शेतकºयांना करण्यात येत आहे.लक्षणे आढळताच करा उपाययोजना!पहिल्या अवस्थेतील कोवळ्या पानावर पांढरे ठिपके पडणे हे लष्करी अळीच्या आक्रमणाचे संकेत आहेत. त्यामुळे शेतात अशा प्रकारचा ५ टक्के प्रादुर्भाव आढळल्यास उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी कामगंध सापळ्याचा वापर एकरी ५ सापळे या प्रमाणे करावा. निंबोळी अर्क ५ टक्के, तसेच निमयुक्त किटक नाशकाची फवारणी करावी. शेतात पक्षी थांबे निर्माण करावे. ‘टी’ आकाराचे एकरी २० पक्षी थांबे शेतात लावावे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. अनिल गाभणे यांनी दिली.
मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 2:42 PM