अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:42+5:302021-05-09T04:35:42+5:30
सुलतानपूर परिसरातील पात्र लाभार्थी वंचित! सुलतानपूर : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत महिला बचत गटास मंजूर झालेला लाभ संबंधितांनी ...
सुलतानपूर परिसरातील पात्र लाभार्थी वंचित!
सुलतानपूर : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत महिला बचत गटास मंजूर झालेला लाभ संबंधितांनी परस्पर हडप करून पात्र महिला बचत गटास लाभांपासून वंचित ठेवत फसवणूक केल्याची तक्रार लोणार तालुक्यातील वेणी येथील महिलांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
पाण्याचा वापर काटकसरीने करा - मुख्याधिकारी
देऊळगावराजा : शहरातील नागरिकांना नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याकरिता प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी केले आहे़
जिल्हा सीमेवर पाेलिसांचा बंदाेबस्त वाढवला
मोताळा : वाढत्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. परजिल्ह्यातील प्रवाशांना ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येत आहे. माेताळा तालुक्यात असलेल्या इतर जिल्ह्यांच्या सीमांवर पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.
लॉकडाऊन अवैध गौण खनिजमाफियांच्या पथ्यावर
डोणगाव : काेराेना संक्रमण वाढल्याने राज्यभरात लाॅकडाऊन करण्यात आले असून, संचारबंदी करण्यात आली आहे. ही संचारबंदी अवैध गाैण खनिजमाफियांच्या पथ्यावर पडत आहे. डाेणगावातून दरराेज शेकडाे ब्रास मुरूम व रेतीची वाहतूक हाेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
लॉकडाऊनमध्ये महागाईचा भडका, सर्वसामान्य त्रस्त
दुसरबीड : काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे तसेच जीवनाश्यक वस्तूंची दुकाने केवळ चार तासच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदीमुळे आधीच सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना जीवनाश्यक वस्तूंचे भावही वाढले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाल्याचे चित्र आहे.
भाेसा येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
भोसा : मेहकर तालुक्यातील आदिवासीबहुल असलेल्या भाेसा गावात काेराेना नियमांविषयी जनजागृतीच करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे काेराेना संक्रमण वाढण्याची भीती आहे.
ग्रंथपाल पदाची भरती सुरू करण्याची मागणी
बुलडाणा : ग्रंथपाल पदाची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व इतर मंत्र्यांना ईमेलद्वारे करण्यात आली. गत अनेक वर्षांपासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पद भरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे.
सहा महिन्यांपासून हाेमगार्डचे मानधन रखडले
बुलडाणा : जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांचे मानधन गत सहा महिन्यांपासून रखडले आहे़ काेराेना काळातही पाेलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या हाेमगार्ड्सना अल्प मानधन मिळते. त्यातही ते वेळेत मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
देऊळगाव मही ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट
देऊळगाव मही : तालुक्यातील देऊळगाव मही येथे काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गावातील दाेघांचा मृत्यू झाला, तर एकाच दिवसात ३१ नव्या रुग्णांची नाेंद झाल्याने देऊळगाव मही काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना, ग्रामस्थ नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे.
दरेगावसाठी टँकर मंजूर
सिंदखेडराजा : तालुक्यातील दरेगाव येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर मंजूर करण्यात आला आहे. दरेगाव येथील २ हजार ३२८ लोकसंख्येकरिता एक टँकर ६२ हजार ४२० लीटर पाणीपुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीने नोंद ठेवावी, असे उपविभागीय अधिकारी महसूल सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.
पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संचारामुळे वाढताेय काेराेना
बिबी : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातही काेराेना माेठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागात आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांचा अहवाल उशिरा येत असल्याने हे रुग्ण गावात फिरत आहेत. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे़
बोराखेडी येथे कोरोना लसीकरण जनजागृती
मोताळा : आदर्श जि. प. शाळा बोराखेडीच्या वतीने कोरोना लसीकरणाची जनजागृती करण्यात आली. तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी व प्राथमिक आरोग्य अधिकारी यांच्या वतीने प्रत्येक गावात शिक्षक घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत.