किसान सेनेचे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर अभिनव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:06 PM2018-04-10T17:06:57+5:302018-04-10T17:06:57+5:30
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सेनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर काट्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आले.
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सेनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर काट्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आले.
शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वैफल्यातून त्यांच्यावर शेतातील भाजीपाला उपटून फेकण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळत असल्याने भावातील फरक मिळावा, हमी भावातील व खासगी व्यापाऱ्यांना विकलेल्या मालाच्या भावातील फरक तत्काळ मिळावा, बंद पडलेले शासकीय खरेदी केंद्र सुरु करावे, दुध, भाजीपाला, हरभरा, सोयाबीन, तुरीला भाव मिळावा, बोंडअळीचे पैसे शेतकºयांच्या खात्यात जमा करावे आदी मागण्यांसाठी किसान सेनेचे उप जिल्हा प्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात काट्यावर बसून आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, किसान सेनेचे तालुका प्रमुख अशोकराव गव्हाणे, युवासेनेचे प्र्रवीण निमकर्डे, राजेंद्र गायकवाड, अनिल जगताप, प्रकाश इंगळे, संदीप राजपूत, प्रभाकर तुपकर, कैलास सपकाळ, कृष्णा धंदर, देवगिर गिरी, शंकर महाराज, भगवान तायडे, दिलीप माळोदे, गजानन भिंगारे, गोटू येरमुले, तेजराव म्हस्के, अनिता शिंगणे, अरविंद साळवे, शे. इस्माईल शे.इब्राहिम, संतोष तायडे, रमेश इंगळे, रवींद्र सुसर, मोहन इंगळे यांची उपस्थिती होती.