बेहिशोबी युरिया वाटप प्रकरणाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:12 AM2020-08-05T11:12:31+5:302020-08-05T11:12:53+5:30
जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात कृषी केंद्र निहाय शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या युरीयाची पडताळणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील एका कृषी केंद्रावरून चार शेतकऱ्यांना कथितस्तरावर वाटप करण्यात आलेल्या एक हजार २८ युरीया खताच्या बॅगांचे कथितस्तरावरील प्रकरण समोर आल्यानंतर कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात कृषी केंद्र निहाय शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या युरीयाची पडताळणी करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी चार आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील१३ ही तालुक्यात अनुषंगीक विषयान्वये पडताळणी करणाºया अधिकारी कर्मचारी व तालुका अधिकाºयांची आॅनलाईनच सविस्तर आढावा बैठक घेऊन युरीया खत वाटपाच्या एकंदरीत स्थितीची पडताळणी त्वरित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दुसरीकडे पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसारही जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी व पाणी करण्यात येत आहे. नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील एका कृषी केंद्रावरून चार शेतकºयांच्या नावे १,०२८ बॅग युरिया खत उचलल्या गेल्याचे समोर आल्यानंतर युरीया खत प्रकरण चांगलेच गाजत आहे.
‘त्या’ केंद्रावरून खत घेणाºया पडताळणी सुरू
शेंबा येथील कृषी केंद्रावरून खत वाटप झालेल्या १,३०० शेतकºयांची पडताळणी सध्या कृषी विभाग करत आहे. कृषी सहाय्यक व तालुका अधिकारी प्रत्यक्ष शेतकºयांशी संवाद साधून त्यांना किती खत मिळाले, याची सविस्तर माहिती घेत आहे. आॅनलाईन खतावणीसह अनुषंगीक कागदपत्रेही तपासण्यात येत आहे.
तालुका निहाय शेतकºयांकडून माहिती संकलन
१३ ही तालुक्यातील कृषी केंद्रवरून किती शेतकºयांनी खत नेले; तसेच ज्या शेतकºयांनी वारंवार खत नेले, अशांची कृषी केंद्रावरील संगणाकातील नोंदी तपासून पडताळणी करण्यात येत आहे. सहा आॅगस्ट रोजी याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील शेतकºयांना वाटप करण्यात आलेल्या युरियाची कृषी केद्रनिहाय तपासणी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने तालुकानिहया पथके सक्रीय झाली असून सहा आॅगस्ट पर्यंत याचा अंतिम अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
नरेंद्र नाईक, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा