लॉकडाऊन काळात १.३५ लाख नागरिकांचा आंतरजिल्हा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:45 AM2020-06-22T10:45:33+5:302020-06-22T10:45:48+5:30
विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत ४५ हजार ३०९ वाहनांना परवानगी दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मिसन अनलॉकच्या दिशने मे महिन्याच्या मध्यावर पावले पडायला लागली असतानाच या कालावधीत जवळपास एक लाख ३५ हजार नागरिकांनी आंतरजिल्हा प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत ४५ हजार ३०९ वाहनांना परवानगी दिली होती.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, मोताळा, बुलडाणा, मेहकरसह अन्य तालुक्यातील मुले, नागरिक हे पुणे आणि मुंबई परिसरात शिक्षणासोबतच उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत किंवा त्या ठिकाणी स्थायीक झालेल आहेत. पुण्या मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाल्याने तेथील आपल्या निकटवर्तीयांना जिल्ह्यात आणण्यासाठीची धावपळ अनेकांनी केली होती. मात्र पुण्या-मुंबईतून बुलडाणा जिल्ह्यात येण्यासाठी भाड्याने वाहने मिळण्याचे प्रमाण अत्यल्प होते. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातूनच या परजिल्ह्यात वाहने घेवून अनेकांनी त्यांच्या पाल्यांना तथा नातेवाईकांना स्वगृही परत आणले होते. मे महिन्यातच स्थालांतरीत मजुरांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. याच कालावधीत जिल्ह्यात जवळपास एक लाखांपेक्षा अधिक नागरिक परतले होते. ४५ हजार वाहनांना परवानगी देण्यात आली होती. चार सिटर कारमध्ये वन प्ल्स टू आणि सेव्हन सिटरमध्ये वन प्लस चार या प्रमाणे परवानगी देण्यात आली होती. झिरो पेन्डन्सी ठेवून या परवानग्या देण्यात आल्या होता.
दरम्यान, मे महिन्याच्या मध्यावर शिथीलतेच्या दिशेने पावले पडू लागल्यानंतर मिळले त्या साधणाने पश्चिम महाराष्ट्रातून, मुंबईतून नागरिक बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतले होते. जवळपास एक लाख नागरिकांना त्यावेळी होम क्वारंटनी करण्यात आले होते. जळगाव, अकोला, औरंगाबाद येथूनही मोठ्या प्रमाणात नागरिक स्वगृही परतले होते.
२६ हजार परवानग्या नाकारल्या
या कालावधीत जिल्हा प्रशासनाने तब्बल २६ हजार ११५ परवानग्याही नाकारल्या आहेत. प्रामुख्याने प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या भागात जाण्यासाठी तथा लॉकडाऊन काळात वाहनाने प्रवास करताना घालून दिलेल्या नियमांब बगल देत जादा प्रवाशी वाहनाद्वारे आणण्याची मागणी केल्यामुळे या परवानग्या नाकारण्यात आल्या होत्या. एकंदरीत जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात एकट्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ७० हजार वाहनांसाठी परवानग्या मागण्यात आल्या होत्या हे आता स्पष्ट होत आहे.