बँकेच्या कामकाजात इंटरनेटचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:46+5:302021-07-09T04:22:46+5:30
शेतकरी अगोदरच पावसासह वेगवेगळ्या संकटाचा संकटाचा सामना करीत आहे. गत वर्षापासून कोरोना महामारीमुळे शासनाने लॉकडाऊनचे लागू केल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती ...
शेतकरी अगोदरच पावसासह वेगवेगळ्या संकटाचा संकटाचा सामना करीत आहे. गत वर्षापासून कोरोना महामारीमुळे शासनाने लॉकडाऊनचे लागू केल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच पेरणीचे दिवस असल्याने अव्वाचे सव्वा भावाने बियाणे, रासायनिक खत आणून पेरणी करावी लागत आहे. लोणार येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेमध्ये काही दिवसांपासून लिंक फेलची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व उद्योजकांना बँकेचे व्यवहार करताना चकरा माराव्या लागत आहेत. बँकेच्या गलथान कारभारामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता येथील बँकेची लिंकची समस्या ९ जुलै पर्यंत दूर करावी अन्यथा १० जुलै पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बँकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे, युवा तालुकाध्यक्ष संजय चाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लवकरच समस्या दूर होतील : शाखाधिकारी
१५ जूनपासून बँकेत लिंकची समस्या आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला असून ग्राहकाचे कामात थोडा विलंब होतो. लवकरच समस्या दूर करण्यात येईल असल्याची माहिती विदर्भ क्षेत्रिय ग्रामीण बँक शाखा लोणारचे शाखाधिकारी टी. एफ. वानखेडे यांनी दिली आहे.