लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाकडून जल जागृती करण्यात येणार आहे. वातावरणातील बदलामुळे गेल्या काही काळापासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पाणी टंचाईचे संकट उभे आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि त्याच्या वापराबाबत जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यााठी २२ मार्च या जागतिक जल दिनानिमित्त राज्य शासनामार्फत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जागतिक जल दिनानिमित्त बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ मार्चपासून जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाणार असून, जल साक्षरतेसाठी पाण्याचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे याबाबत सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जलसंपदा विभागामार्फत विशेष कार्यक्रम राबविला जाणार असून, सप्ताह कालावधीत कृषी, पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास, नगरविकास, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण या विभागामार्फत जल जागृतीचे विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. घरगुती पाणी वापराबाबत बचतीचे उपाय, वितरण व्यवस्थेतील पाणी नाश टाळण्यासाठी उपाय, टंचाई भागात पाणी पुरवठ्याची व्यवस्था, ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची व्यवस्था व तेथील यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जागृती करण्यात येणार आहे.
जल साक्षरतेविषयी होणार प्रबोधन जिल्ह्यात १६ ते २२ मार्च या कालावधीत होणाºया जल जागृती सप्ताहादरम्यान जल जागृती करणारी कार्यशाळा, व्याख्यान, जलदिंडी, वक्तृ त्व, रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध नद्यांमधील पाण्याचे कलश पूजन करून व जलप्रतिज्ञा करण्यात येणार आहे. वॉटर रन, चित्रकला व वक्तृ त्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाºया स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे.