लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: जगभर थैमान घातलेल्या कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीचा जनता कर्फ्यु देशात प्रथमच पाळण्यात येत आहे. यानुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला चिखलीकरांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 7 वाजेपासूनच शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तथापि ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व जनतेने स्वतः ला होम क्वारंटाईन केले असल्याने अगदी घरांची दारं देखील बंद आहेत.. हॉस्पिटल वगळता इतर सर्व प्रकारच्या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत..चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, डी पी रोड, जयस्तंभ चौक, हिंदुसूर्य महाराणा प्रताप मार्केट, चिंच परिसर, नगर परिषद, पंचायत समिती, तहसील, राऊत वाडी, जिल्हा सहकारी बँक चौक, मेहकर फाटा आणि मुख्य बाजारपेठ यासह महामार्ग निर्मनुष्य असल्याने ओस पडले आहेत. कोणत्याही प्रकारची वाहने देखील रस्त्यावर दिसत नाहीत.. तर नेहमीची वरदळीच्या ठिकाणांवर खबरदारी चा उपाय म्हणून चिखली पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रहदारीचे रस्ते पूर्णपणे बंद केले आहेत.. शहरात सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा आहे. तर जनता कर्फ्यु च्या पृष्ठभूमीवर चिखलीकरांनी शनिवार 21 मार्च रोजी देखील शहरात बंद पाळला. शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी काळापासूनच आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. तर आज कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याने शहरात सर्वत्र 'पिन ड्रॉप सायलेन्स'ची अनुभूती येत आहे
Janta Curfue: चिखलीकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 2:55 PM