- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढणाऱ्या जिगाव प्रकल्पातंर्गत पुनर्वसन करावयाच्या ४७ गावांपैकी काही गावातील भुखंड वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्यानुषंगाने पलसोडा येथे सध्या पुनर्वसन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून आहेत.दरम्यान, २३ जुलै रोजी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांनी जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भातील कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी पुनर्वसनाच्या कामांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सुचीत केले होते. जानेवारी २०२१ पर्यंत पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करावयाच्या गावांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. प्रामुख्याने १३ गावातील कामे तथा प्लॉट वाटपास प्राधान्य द्यावयास सांगण्यात आले होते.त्यानुषंगाने २२ जुलै पासून पुनर्वसन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामास प्रारंभ केला आहे. खरकुंडी येथील काम सुरू झाले ््असून त्यात आलेल्या काही त्रुट्यांमुळे भूखंड वाटपात अडचणी येत आहेत. प्रारंभी येथील बाधीतांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मलकापूरचे आमदार राजेश ऐकडे, प्रशासनाचे अधिकारी सध्या येथे भुखंड वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागपंचमी सणानिमित्त हे काम बंद राहणार असल्याने २६ जुलै पासून पुन्हा ते सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. येत्या काळात जिगाव, पलसोडा, टाकळी वतपाळ येथील काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे बाधीत होणाºया कुुटुांंची संख्या सातहजार ९८० असून ९६ कुटुंबांचे आतापर्यंत पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास २४ कोटी रुपयांचा खर्च आला असून अद्यापही ४५ गावांचे खºया अर्थाने पुनर्वसन बाकी आहे. दुसरीकडे जिगाव प्रकल्पासाठी एकूण १७ हजार १३८ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार असून त्यापैकी चार हजार २४९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप १२ हजार ८८८ हेक्टर जमीन संपादीत करणे बाकी आहे. संपादीत जमिनीच्या मोबदल्यापोटी ५१७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून सध्या ५७६ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असल्याची माहिती आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार काम सुरू आहे.जानेवारी २०२१ पर्यंत प्लॉट वाटप करणारजिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बाधीत होणाºया ३२ गावातील नागरिकांच्या पूनर्वसनाच्या दृष्टीने प्लॉटची मोजणी करून त्याचे काम जानेवारी २०२१ पर्यंंत पुर्ण करावयाचे आहे. २३ जुलै रोजी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या आढाव्या दरम्यान, ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानुषंगाने पुनर्वसन विभागाचे अधिकारी सध्या पलसोडा या गावात तीन दिवसापासून ठाण मांडून बसले आहेत.दोन गावांचे पुनर्वसन पुर्ण; ४५ गावांचे बागीजिगाव प्रकल्पातंर्गत ३२ गावांचे पुर्णत: आणि १५ गावांचे अंशत: असे एकूण ४७ गावांचे पूनर्वसन करावयाचे आहे. कोदरखेड गावाचे प्लॉट वाटपाचे काम पूर्णत्वास आले असून खरकुंडी गावाचे पुनर्वसन झाले आहे. ९६ कुटुंबांना त्याचा फायदा झाला आहे. पुनर्वसन करावयाच्या २२ गावापैकी नऊ गावांची कामे अद्याप सुरू झालेली नाही.
जिगाव: पुनर्वसनाच्या कामाने घेतला वेग; प्लॉटची मोजणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:11 AM