रस्त्यावर फिरणाऱ्यांची केली कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:31 AM2021-03-15T04:31:00+5:302021-03-15T04:31:00+5:30

जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांच्या आदेशानुसार, रविवारी लोणार येथील बसस्टँड चौकात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या लोकांच्या ...

Kelly Corona inspects pedestrians | रस्त्यावर फिरणाऱ्यांची केली कोरोना तपासणी

रस्त्यावर फिरणाऱ्यांची केली कोरोना तपासणी

Next

जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांच्या आदेशानुसार, रविवारी लोणार येथील बसस्टँड चौकात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या लोकांच्या कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यावेळी काळी-पिवळी टॅक्सीत गर्दीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ही सक्तीने टेस्ट करण्यात आल्या. फळविक्रेते, हातगाडी चालक, ऑटो चालक यांच्यासह विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे बाजारपेठेसह मुख्य चौकातील रहदारीसह परिसरातील गर्दी काही मिनिटात ओसरल्याचे दिसून आले. याप्रसंगी तहसीलदार सैफन नदाफ, नायब तहसीलदार हेमंत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. फिरोज शाह, कोविड सेंटर व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, रुग्णकल्याण समिती सदस्य डॉ. मुंदडा, निमा अध्यक्ष डॉ. झोरे, कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिरसाट, डॉ. खोडके, टेक्निशियन सुरडकर, ब्रदर सचिन मापारी, शिंदे, तलाठी सचिन शेवाळे यांच्यासह नगरपरिषदचे कर्मचारी पवार, गजानन बाजड उपस्थित होते. यावेळी ए. पी. आय. बंसी पवार व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Kelly Corona inspects pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.