खामगाव : भूखंड घोटाळ्यात आरोपी वाढण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:36 PM2020-12-05T16:36:18+5:302020-12-05T16:38:19+5:30

Khamgaon News साक्षीदार आणि बनावट सातबारा देणारांचाही पोलिसांकडून आता कसून शोध घेतल्या जात आहे.

Khamgaon: Accused in plot scam likely to increase | खामगाव : भूखंड घोटाळ्यात आरोपी वाढण्याची शक्यता 

खामगाव : भूखंड घोटाळ्यात आरोपी वाढण्याची शक्यता 

Next

 - अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. याप्रकरणी आरोपी वाढण्याची दाट शक्यता असून, साक्षीदार आणि बनावट सातबारा देणारांचाही पोलिसांकडून आता कसून शोध घेतल्या जात आहे. त्यामुळे शहरातील भुखंड माफीया आणि त्यांच्या चेलेचपाट्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव भाग-१ चा तत्कालीन तलाठी राजेश चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. याद्वारे खामगाव उपविभागातील ९४ पेक्षा अधिक सातबाऱ्यांची मालकी बदलवून दुसऱ्यांच्या नावावर खरेदी करून देणाऱ्या  चोपडेने वरिष्ठांचीही दिशाभूल केली. 
दरम्यान, याप्रकरणी वर्षभरात १४ आरोपींना अटक करण्यात आली.  यातील काही आरोपी अद्यापही फरार असून, बनावट सातबारा तयार करण्यात आल्यानंतर खरेदी करून देणाऱ्यास उपलब्ध करणाऱ्यांचाही पोलिस प्रशासनाकडून आता शोध घेतल्या जात आहे. याप्रकरणी सहकाºयाची फसवणूक आणि अनेकांना ‘ठेंगा’ दाखविणारा एक जण काही दिवस फरार होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यास यात आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे.


अटक करण्यात आलेले १४ आरोपी!
भुखंड घोटाळ्यात आतापर्यंत शहर पोलीसांनी मुख्य सुत्रधार राजेश ज्ञानदेव चोपडे(५१) रा. रॅलीज प्लॉट खामगाव, ललीत शेषराव झाडोकार (४०) , स्वप्नील शेषराव झाडोकार (३७) दोघेही रा.संजिवनी कॉलनी, खामगाव, लक्ष्मण प्रल्हाद फाळके (६४) रा. टाकळी हाट ता. शेगाव, देविदास किसन राजनकर (६९), मुकींदा हरीश्चंद्र उमाळे (५०), समाधान शंकर वाघ (७०) तिघेही रा. पातुर्डा खुर्द ता. संग्रामपूर,  रमेश वासुदेव राऊत (४५),  रा. पारखेड ता. खामगाव, प्रभाकर मुकदन पिसे (४९) रा. पाडसुळ ता.शेगाव, शैलेश श्रीकृष्ण चोपडे (२९) रा. वृंदावन नगर वाडी ता. खामगाव, गोपाळराव पांडुरंग तायडे (८५) रा. हिंगणा निंबा ता. बाळापूर जि. अकोला, गुलाबराव हरीभाऊ क्षिरसागर (७०) रा. रोहीणखेड ता. मोताळा जि. बुलडाणा, दिलीप रामकृष्ण लोखंडे(५९), सुरेश रामकृष्ण लोखंडे (५०) दोघेही रा. हिंगणी बु., ता. तेल्हारा जि. अकोला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Web Title: Khamgaon: Accused in plot scam likely to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.