बाजारभाव स्थिर, मात्र आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:05 PM2021-05-09T12:05:05+5:302021-05-09T12:05:12+5:30

Khamgaon APMC News : कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. 

Khamgaon APMC : Market prices stabilized, but inflows declined | बाजारभाव स्थिर, मात्र आवक घटली

बाजारभाव स्थिर, मात्र आवक घटली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मागील दोन आठवड्यांतील शेतमालाचे बाजारभाव हे स्थिर आहेत. मात्र लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. 
    खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. येथे केवळ खामगाव तालुकाच नाही तर मेहकरपासून जळगाव जामोदपर्यंतचे शेतमाल विक्रीसाठी आणतात. यावषीर् कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर लागलेल्या लाॅकडाऊनमध्ये केवळ खामगाव तालुक्यातील शेतमालच खरेदी करण्याचे आदेश दिल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. शनिवारी व रविवारी दोन दिवक केवळ भुइमुगाची खरेदी करण्यात आली. भुइमुगाची पेरणीच कमी प्रमाणात असल्याने आवकही कमीच आहे. 
मागील वर्षी कोराेनाने  हाहाकार माजविला. देशभरात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले होते. याच कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा या वर्षीसुद्धा फटका बसला आहे.  शेतमाल विक्रीसह शेतकऱ्यांना फळ विक्री व भाजीपाला विक्री करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी तर फळे व भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून शेतात शेतमाल पिकविला त्या शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तो माल विक्री  करण्याची घाई केली नाही. 
शेतकरी बाजारभाव वाढतील या आशेवर थांबले होते. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत असलेले बाजारभाव  काही प्रमाणात  स्थिर आहेत. सोयाबिनच्या भावात गत काही दिवसांपूवी वाढ झाली. मात्र सध्या शेतकर्यांकडे सोयाबिन नसून, व्यापार्यांकडेच साठवूण ठेवलेला आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात सोयाबिनची आवक होत आहे. 
शेतमाल गावातून शहरात आणण्यातही अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी शेतमाल घरीच ठेऊन आहे. 

शासनाकडून दरवर्षी शेतमालाचे हमीभाव जाहीर करण्यात येतात. मात्र व्यापारी त्या हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.हमी भावानेच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी हाेण्याची गरज आहे. 
 - रामेश्वर गिर्हे, 
शेतकरी,  

शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून शेतमाल पिकविला. मात्र उत्पादन खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले  आहे. 
- गजानन तायडे , 
शेतकरी,  

Web Title: Khamgaon APMC : Market prices stabilized, but inflows declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.