खामगाव: नागरिक स्वत:हून घेताहेत काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:26 PM2020-03-31T17:26:47+5:302020-03-31T17:26:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून खामगाव शहरातील शिवाजी नगर, सतीफैल भागातील नागरिकांनी ...
Next
ल कमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून खामगाव शहरातील शिवाजी नगर, सतीफैल भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे आपल्या भागातील गल्ली सील केल्या आहेत. अनोळखी इसमास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर हाहाकार माजविला आहे. बुलडाणा जिल्ह्यातही एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या इसमाच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनेकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. दरम्यान, खामगाव येथील सजनपुरी भागातील एका इसमासह त्याच्या कुटुंबातील तिघांना बुलडाणा येथे आयसोलेशन करण्यात आले. त्यामुळे खबरदारी म्हणून शिवाजी नगर, सतीफैल या भागातील नागरिकांनी स्वत: खबरदारी घेत परिसर सिल केला आहे. ‘हम सब ने ठाणा है’चे जागोजागी फलकहम सब ने ठाणा है! कोरोना को हराणा है, असे फलक शिवाजी नगर, सती फैल भागात जागोजागी लावण्यात आले आहे. या भागातील नागरिक स्वत:हून गल्ली सील करून प्रशासनाला सहकार्य करीत आहे. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवाजी नगर भागातील स्वत:हून बांबू, लाकडी बल्ल्या तसेच आपल्या वाहनांचा आडोसा करीत गल्ली सील करीत आहे. शिवाजी नगर, सतीफैलातील नागरिकांचा संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.- प्रवीण कदमनगरसेवक, शिवाजीनगर, खामगाव.