- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणारे पालिकेच्या रडारवर आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या विविध नियमांचे पालन न करणाऱ्या तब्बल १८७ जणांना पालिकेने आपला हिसका दाखविला. कोविड-१९ या आपातकालीन परिस्थितीत पालिकेने सुमारे दोन लक्ष रुपयांचा दंड वसूल केला आहे. मोठ्याप्रमाणात दंड वसुली करणारी खामगाव ही जिल्ह्यात पहिलीच पालिका ठरली आहे.बुलडाणा जिल्ह्यात सर्वातमोठी नगर पालिका म्हणून खामगाव नगर पालिकेची ओळख आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संक्रमणामुळे जिल्ह्यातील सर्वच नगर पालिका, नगर पंचायत स्तरावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून दंड ठोठावण्यात येत आहे. यामध्ये सार्वजनिक स्थळी चेहºयावर मास्क न वापरणे, दुकानदार/ फळभाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांनी फिजीकल डिस्टन्सिंग न राखणे, विक्रेत्याने मार्कींग न करणे, किराणा/ जीवनावश्यक वस्तू विक्रेता वस्तूचे दरपत्रक न लावणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून अत्यावश्यक नसलेले दुकान सुरू ठेवून गर्दी जमा करून फिजीकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आदी कारवाईचा समावेश आहे. या कारवाईत जिल्ह्यात खामगाव पालिकेने बाजी मारली असून सार्वजनिक स्थळी मास्क न वापरणाºया १४६ जणांवर पालिकेने कारवाई केली. त्यांच्याकडून ५००, १००० आणि १५०० असा एकुण ७४ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर अत्यावश्यक सेवा नसलेले दुकान उघडल्याप्रकरणी १४ जणांकडून प्रत्येकी ५ हजार रूपयांप्रमाणे ७० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. व्यावसायिकांकडून शारिरीक अंतर न राखल्याच्या १९ कारवाई पालिकेने केल्या आहेत.तर दुकानदार, भाजी विक्रेते यांच्याकडून फिजीकल अंतर न राखल्याप्रकरणी ०८ कारवाई अशा एकुण १८७ कारवाई २३ मार्च ते २३ जुलै या कालावधीत करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांचा विसर!कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी एकही कारवाई गत चार महिन्यांच्या कालावधीत पालिकेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कारवाईचा पालिकेला सोईस्कर विसर पडल्याचे दिसून येते.