खामगाव नगर पालिका कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 06:32 PM2018-07-10T18:32:20+5:302018-07-10T18:35:14+5:30

खामगाव: नगर पालिका आणि नगर पंचायतीतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला पोहोचल्याचे दिसते.

 Khamgaon municipality employees union association dispute! | खामगाव नगर पालिका कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला!

खामगाव नगर पालिका कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला!

Next
ठळक मुद्देनगर परिषद कर्मचारी संघटनेच्या सर्वसाधारणसभेपूर्वीच शेगाव येथे मेळावा घेवून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शेगाव येथील संघटनेचा मेळावा नियमबाह्य असल्याचा दावा संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: नगर पालिका आणि नगर पंचायतीतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला पोहोचल्याचे दिसते. राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या सर्वसाधारणसभेपूर्वीच शेगाव येथे मेळावा घेवून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेगाव येथील संघटनेचा मेळावा नियमबाह्य असल्याचा दावा संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा  १४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद, हिंगोली कल्याण मंडपम येथे संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. या सर्वसाधारण सभेत नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून आंदोलनाची भूमिका निश्चित करणे, यासोबतच कर्मचारी हिताच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, तत्पूर्वीच संघटनेचे सदस्य के.के. आंधळे यांनी शेगाव येथे मेळावा घेत, संघटनेची कार्यकारिणी घोषीत केली. या कार्यकारिणीला विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीने आव्हान दिले. आंधळे यांनी घोषित केलेल्या कार्यकारिणीला बेकायदेशीर ठरविण्यात आले. परिणामी, महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येते.  वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी मंगळवारी खामगाव नगर पालिकेत भेट दिली. कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांसह पदाधिकाºयांशी संवाद साधला. यावेळी नगर पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहन अहीर, उपाध्यक्ष सुनील सोनोने, दीपक कदम, सचिव दुर्गासिंह ठाकूर, मुन्ना राजपूत, अनंत निळे, मंगेश पंचभूते, मुंकुदा तायडे,  अनंत निळे, प्रविण ठाकरे, कुणाल जाधव, स्वप्नील मोरे, सुरज खिल्लारे, के.जी. शर्मा, रवि देशमुख, बाळू रसरकटे, अजय गवळे यांची उपस्थिती होती.


शेगाव येथील मेळावा बेकायदेशीर!
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचा ८ जुलै रोजी शेगाव येथे पार पडलेला मेळावा हा घटनाबाह्य असल्यामुळे बेकायदेशीर असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी केला आहे. मेळावाच बेकायदेशीर असल्यामुळे या मेळाव्यात संघटनेची घोषीत करण्यात आलेली कार्यकारिणीही बेकायदेशीर असल्याचेही घुगे यांनी स्पष्ट केले. तसेच  शेगाव येथील मेळाव्यात घोषीत झालेल्या कार्यकारिणीचा महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावाही राज्याध्यक्ष घुगे यांच्याकडून करण्यात आला.

 शेगाव येथे घोषित केलेल्या कार्यकारिणी वाद्यांत!

महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचा मेळावा रविवार ८ जुलै रोजी शेगाव येथे मेळावा घेतला. यामध्ये सभा घेत, कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र, याकार्यकारिणीमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्ती झालेल्यांनी संघटनेशी संबध नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे शेगाव येथे घोषित कार्यकारिणी वाद्यांत सापडली आहे. दरम्यान, पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही विद्यमान अध्यक्षांनी वर्षभर आमसभा न बोलविता, कार्यभार सुरू ठेवला. त्यामुळे सदस्य या नात्याने आमसभा बोलावून कार्यकारिणी जाहीर केली. ही कार्यकारिणी बेकायदेशीर नसल्याचा दावा के.के. आंधळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रतिनिधीने नाव दिले असल्यास एखाद्या कर्मचाºयांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली. त्यांचा आक्षेप असल्यास कार्यकारिणीतून त्यांचे नाव कमी केले जाईल, अशी ग्वाही देखील के.के. आंधळे यांनी  लोकमतशी बोलताना दिली.
 

Web Title:  Khamgaon municipality employees union association dispute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.