लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खामगाव तालुक्यातील संपूर्ण कपाशीचा पेरा धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव तालुक्यात १९४३0 हेक्टरवर कपाशीची पेरा असून, संपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आल्याची माहिती आहे.खामगाव तालुक्यात कपाशीचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे या भागातील शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. दरम्यान, पेरणीनंतर साधारणपणे ९0 दिवसांनंतर आढळून येणार्या गुलाबी बोंडअळीने ऑगस्टमध्येच कपाशीवर हल्ला चढविला. त्यामुळे खामगाव तालुक्यातील कपाशीचा संपूर्ण पेराच धोक्यात आल्याचे कृषी विभागाच्या पाहणी दिसून आले आहे. गुलाबी बोंडअळीचा कपाशीवरील प्रकोप वाढल्यानंतर कृषी विभागाच्यावतीने तातडीने कपाशीच्या शेतीच्या पाहणीस सुरुवात करण्यात आली. या पाहणीत धोकादायक गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे संपूर्ण क्षेत्रच आर्थिक नुकसान पातळीत आढळून आले आहे. परिणामी, शेतकर्यांकडून कपाशी पिकाच्या झालेल्या हानीचे मूल्यमापन करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेला अनुसरून, ‘नमुना-जी’मध्ये तक्रार अर्ज मागविण्यात येत आहेत.
५.५0 हजारांवर शेतकर्यांचे अर्ज!गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाची हानी झाल्याचे निर्दशनास आलेल्या हजारो शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत. कृषी कार्यालयात तक्रारींचा ओघ कायम असून, २८ नोव्हेंबरपर्यंत ३५३८ शेतकर्यांनी ‘नमुना-जी’नुसार तक्रार अर्ज सादर केले होते. दरम्यान, ७ डिसेंबरपर्यंत ैंयात आणखी दोन हजारांवर अर्जाची भर पडली असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
डिसेंबरपूर्वी कपाशी काढावी!कपाशीवर सर्वात धोकादायक असलेल्या रसशोषक गुलाबी बोंडअळीचा प्रकोप आढळून आला आहे. ही बोंडअळी ठिप्पक्यांच्या आणि हिरव्या बोंडअळीच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. त्यामुळे शेतकर्यांनी फरदळीपासून उत्पन्न न घेता, डिसेंबरपूर्वी कपाशी काढून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी नत्रयुक्त खतांचा वापर करण्याचा सल्लाही कृषी विभागाकडून दिल्या जात आहे.
तालुक्यातील १९३४0 हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाची पाहणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेतकर्यांच्या तक्रारीही कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे.- एस.एस. ढाकणे,तालुका कृषी अधिकारी, खामगाव.-