अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांसोबतच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा पहिला मान श्रीमती मीरा रमेशचंद्र देशमुख यांना मिळाला आहे. ३१ डिसेंबर अखेरीस श्रीमती मीरा देशमुख यांचा संपूर्ण मालमत्ता कर पालिकेने माफ केला आहे.
नगरसेवक बोर्डे यांनी मांडला होता ठराव!माजी सैनिकांच्या विधवांसोबतच उत्कृष्ठ कामांमुळे शौर्य पदक प्राप्त करणाºया सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव नगरसेवक हिरालाल बोर्डे यांनी सभेसमोर मांडला. या ठरावाला आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांनुमते हा ठराव पारीत करण्यात आला होता. याठरावाबाबत नगराध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार यांच्यासह नगरसेवकांनी बोर्डे यांचा गौरवही केला होता.
शहरातील इतरांनाही मिळणार लाभ!खामगाव नगर पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांची यादी सैनिक कल्याण बोर्डांकडून मागविण्याच्या सूचना नगरसेवक हिरालाल बोर्डे यांना देत, खामगाव मतदार संघाचे आ. आकाश फुंडकर यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार नगरसेवक तथा माजी सैनिक हिरालाल बोर्डे यांच्या पुढाकारात पालिका प्रशासनाने सैनिक कल्याण बोर्डांशी पत्रव्यवहार चालविला आहे.
देशासाठी बलिदान देणाºया सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय खामगाव पालिकेने घेतला आहे. या निर्णयाचा पहिला मान माजी सैनिक विधवा पत्नी मीरा रमेशचंद्र देशमुख यांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे.- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव
देश रक्षणार्थ लढणाºया पतीच्या कार्याचा गौरव म्हणून खामगाव पालिकेने मालमत्ता कर माफ केला आहे. प्रथम दर्शनी ही लहानशी बाब असली तरी, पतीच्या कार्याची दखल म्हणून ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या देशसेवेचे या निमित्ताने फलित झाले आहे.- श्रीमती मीरा देशमुख, खामगाव