खामगाव : शिधापत्रिका न दिल्याने लिपिकाची कॉलर धरली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:58 AM2018-03-07T00:58:19+5:302018-03-07T00:58:19+5:30
खामगाव : तालुक्यातील अनेक लाभार्थींना अनेक महिन्यांपासून शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचे वास्तव आहे. शिधापत्रिका न मिळाल्याने मंगळवारी येथील तहसील कार्यालयात लिपिकासोबत वाद होऊन शेतकºयाने त्याची कॉलर पकडल्याची घटना दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील अनेक लाभार्थींना अनेक महिन्यांपासून शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचे वास्तव आहे. शिधापत्रिका न मिळाल्याने मंगळवारी येथील तहसील कार्यालयात लिपिकासोबत वाद होऊन शेतकºयाने त्याची कॉलर पकडल्याची घटना दुपारी घडली.
शिधापत्रिका अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजला जातो. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिक शिधापत्रिका मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतात. रेशन कार्डमधील नावे कमी करणे, नावे वाढविणे, विभक्त रेशन कार्ड काढणे आणि नव्याने रेशन कार्ड काढण्यासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने तहसील आॅफिसला रोज प्रकरणे दाखल करतात; परंतु महिना-महिना होऊनही काही लोकांना रेशन कार्ड मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष वाढला आहे. मंगळवारी दुपारी रेशन कार्ड विभागात कोलोरीच्या काही शेतकºयांनी रेशन कार्डची मागणी केली असता तुमचे रेशन कार्ड झाले नाही, असे संबंधित लिपिकाने सांगितले. त्यामुळे शेतकºयाने चिडून संबंधित लिपिकाची कॉलर पकडली. तेवढ्यात काहींनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा तक्रार दाखल झाली नाही. रोजची मजुरी पाडून शेतकºयांना दररोज तहसील आॅफिसवर चकरा मारणे शक्य नाही. त्यामुळे तहसीलदारांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकºयांना होणारा त्रास कमी करावा व तत्काळ रेशन कार्ड विभागातील कामाला गती द्यावी, ही मागणी होत आहे.
प्रकरणे निकाली काढली!
मागील सहा महिन्यांआधी आमदार आकाश फुंडकर यांनी लक्ष घालून दोन वर्षांची असलेली रेशन कार्डसंबंधी पेंडन्सी पूर्ण करुन घेतली होती. आतासुद्धा नागरिकांकडून तीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमच्या विभागात एकच कर्मचारी असल्याने कामात थोडा उशीर होत आहे; परंतु आमच्याकडे जास्त पेंडन्सी नाही. आठवडाभरात आलेली प्रकरणे आम्ही निकाली काढत आहोत.
- जी.बी. चव्हाण,
नायब तहसीलदार, पुरवठा विभाग