प्रतिबंधित क्षेत्राचा खामगावकरांना विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:20 PM2020-07-22T17:20:26+5:302020-07-22T17:20:32+5:30

प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना चक्क प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले.

Khamgaonkars forget the restricted area | प्रतिबंधित क्षेत्राचा खामगावकरांना विसर

प्रतिबंधित क्षेत्राचा खामगावकरांना विसर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या खामगाव शहरातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राचा विसर पडल्याची बाब पाहावयास मिळाली. प्रशासनाने उभारलेल्या कठड्यांना कसरत करीत ओलांडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे की काय, अशी स्थिती यावेळी दिसून आली.
खामगाव शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दोनशेच्या घरात पोहचत आहे. एका कोरोना संशयीत रूग्णांवरील अंत्यसंस्कार आणि एका व्यक्तीचे अकोला कनेक्शन या दोन गोष्टी खामगावकरांसाठी जीवघेणे ठरत चालले आहे. वाढत्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदी शिथिल कालावधीत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. यावेळी प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना चक्क प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले. या अनुषंगाने शहरातील अग्रसेन चौक परिसर प्रतिबंधीतक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्राशी स्थानिक नागरिकांसह ये-जा करणाऱ्यांकडून छेडछाड केली जात आहे. बॅरीगेट्स् ही हलविण्यात येत आहेत. तसेच शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राच्या भागात वाहनांचीही रेलचेल सुरू झाल्याचे चित्र आहे. यावेळी झालेल्या गर्दीमुळे वाहतूक नियंत्रीत करणे पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.

Web Title: Khamgaonkars forget the restricted area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.