शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

आरोग्य सुविधांचा अभाव

By admin | Published: September 01, 2014 10:19 PM

मेहकर ग्रामीण रुग्णालयाकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

मेहकर : बदलत्या वातावरणाने तालुकाभर डेंग्युसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अशातच खाजगी रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. परंतू, मेहकर ग्रामीण रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथील रुग्ण वार्‍यावर असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने ३१ ऑगस्ट रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनने समोर आले असून, ग्रामीण रुग्णालयाचा कारभारही चव्हाट्यावर आणला.मेहकर व लोणार तालुक्यात डेंग्यु आणि मलेरियाने थैमान घातले असून शहरातील रुग्णालये हाऊस फुल्ल झाली आहेत. डेंग्यु सदृश्य तापेमुळे मेहकर व लोणार तालुक्यातील दोन जण दगावल्याची घटना गत आठवड्यात घडली होती. तसेच मेहकर शहरासह तालुक्यात व लोणार तालुक्यातील पिंपळनेर, किन्ही, कोयाळी, सरस्वती, याठिकाणीही डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर विविध कारणांमुळे साथीच्या आजारानेही डोकेवर काढले आहे. यामध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांच्या साथी प्रामुख्याने आढळतात. पाण्याचे स्त्रोत दुषित होऊन त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. सद्यस्थितीत शासकीय तसेच खासगी रुग्यालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये डायरिया व टायफाईडचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे आढळुन आले आहे. परंतू, या साथिच्या आजारावर नियंत्रण घालण्यास आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. गोरगरिंब रुग्णांना जिवनदायी म्हणुन ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. आजही सर्वाधिक रुग्णांची मदार ग्रामीण रुग्णालयावर आहे. परंतू, ग्रामीण रुग्णालयात येणार्‍या रुग्णांकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधुन उघड झाला आहे. लोकमत प्रतिनिधींनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, रुग्णालायातील विविध समस्या समोर आल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात सध्या १९ कर्मचारी कार्यरत असून, चार जागा रिक्त आहेत. मात्र, ड्युटीवर असलेल्यापैकी रुग्णालयात केवळ एकच परिचर हजर दिसूून आला ; तर २५ रुग्ण उपचारार्थ भर्ती होते. वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या रिकाम्या खुच्र्या यावेळी लोकमत प्रतिनिधीना दिसून आल्या. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, रुग्णालय परिसरात गाजर गवतही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. ग्रामीण रुग्णालयातील अपुर्‍या सुविधांमुळे व डॉक्टरांच्या दुर्लक्षीमुळे रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचेही वास्तव लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन मधुन समोर आले आहे. ** रुग्णांचे हाललोकमत चमू ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १२.१५ वाजता मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी संपुर्ण रुग्णालयाची पाहणी केली असता वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीला फॅन हवा मारत असल्याचे दिसून आले. तर वैद्यअधिकारी व कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय झाली होती.** रिक्त पदांचा बोजाभेटी दरम्यान रुग्णालयातही एकही डॉक्टर आढळून आला नाही. त्यानंतर प्रत्येक वार्डात जाऊन पाहिले असता, एकच परिचर संपुर्ण रुग्णांची देखभाल करीत होता. यासंदर्भात माहिती घेतली असता आज रविवार असल्यामुळे शक्यतोवर डॉक्टर हजर राहत नाहीत अशी माहिती मिळाली. या ग्रामीण रुग्णालयात १९ कर्मचारी कार्यरत आहे. इतर चार पदे रिक्त आहेत. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक व लॅब टेक्नीशन यांचा समावेश आहे.