राताळी ते काटोडा शेतरस्ता गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:53+5:302021-07-01T04:23:53+5:30
साखरखेर्डा परिसरात २८ जून राेजी माेठ्या प्रमाणात पाऊस झाला़ या पावसामुळे, नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणीच पाणी साचले़ ...
साखरखेर्डा परिसरात २८ जून राेजी माेठ्या प्रमाणात पाऊस झाला़ या पावसामुळे, नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणीच पाणी साचले़ त्यामुळे पेरणी केलेल्या शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ शेकडाे हेक्टवरील पिके पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे़ त्यातच यावर्षीच तयार केलेला राताळी-काटोडा हा शेतरस्ता जोरदार पावसाने वाहून गेला आहे़ हा शेतरस्ता वाहून गेल्याने त्या भागात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. शेतात जायचे असेल तर पाण्यातून वाट शोधत जावे लागणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ संबंधित विभागाने या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी, अशी मागणी त्या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने भानुदास लव्हाळे यांनी केली आहे.