कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नितीन जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दीपक लहासे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या पूजनानंतर कार्यक्रमाचे आयोजक डॉ. स्वप्निल दांदडे यांनी ग्रंथापालन व्यवसायाची मूलतत्त्वे आणि आधुनिकतेकडील वाटचाल विषयावर प्रकाश टाकून ग्रंथपाल दिनाचे औचित्य प्रस्तावनेतून पटवून दिले. प्रमुख उपस्थित प्रा. लहासे यांनी वाचनातून प्रगती विषयावर तर डॉ. नितीन जाधव यांनी ग्रंथालयाच्या कार्यप्रणालीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. डॉ. गायकी, प्रा. सिरसाट, डॉ. रिठे, डॉ. वानखेडे, डॉ. शहिदा नसरीन, प्रा. मोरे, यांचे हस्ते ग्रंथ व संगणकांचे पूजन करण्यात आले. उबाळे, मालठाने, दसरकर यांनीदेखील प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली. संचलन ग्रंथालय परिचर संदीप तोटे यांनी केले, तर आभार शाकीर शहा याने मानले. कोरोना परिस्थितीचे भान ठेवून गणेश जाधव, अंकुश पठ्ठे, अविनाश लहासेंसह अगदी मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.
राजे छत्रपती कला महाविद्यालय येथे ग्रंथपाल दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:35 AM