शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

विजेअभावी पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:47 AM

मेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्‍वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बसत आहे.   सध्या सुरळीत स्वरूपात वीजही शेतकर्‍यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, कपाशी ही पिके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे; मात्र वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे. रात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो. त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्‍याचदा वीज प्रवाह बंद असतो. मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन-तीन वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. नोटबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतकर्‍यांच्या हातून जातो की काय, अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.

चार गावात होत आहे नुकसानअकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यातील कोयाळी सास्ते, बाभुळखेड येथील शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्‍यांनी सुरळीत वीज पुरवठय़ाची मागणी केली आहे.

कर्मचार्‍यांची कमतरता; रोहित्रही मिळेनाअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विजेसंदर्भातील कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. अधिकार्‍यांना, शेतकर्‍यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहित्र जळाल्यास त्वरित शेतकर्‍यांना ते बदलून मिळत नाही. खामगाव येथून वीज रोहित्र आणण्यासाठी शेतकर्‍यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड होत आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनFarmerशेतकरी