जिल्ह्यात पावसाची रिमझिम
बुलडाणा : मागील आठवड्यापासून बुलडाणा शहर आणि परिसरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसला. बरसणारा पाऊस नदी-नाल्यांना पूर आणत असून, यामुळे पिकांना जीवदान मिळत आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस राहणार असल्याची शक्यता आहे.
बुलडाणा ते उंद्री रस्त्याची दुरवस्था
उंद्री : बुलडाणा ते उंद्री जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याने वाहनचालकांना गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक अपघातही झालेले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी आता पावसाची रिपरिप सुरू झाली असून, रस्ते निसरडे झाले आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामे करताना असलेला मुरूम लवकर उचलावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.