बुलडाणा: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा पुकारण्यात आलेल्या सात जुलै ते २१ जुलै दरम्यान लॉकडाऊन पुकारण्यात आला असून त्यास पहिल्या दिवशीच अर्थात सात जुलै रोजी व्यापाऱ्यांनी तथा अस्थायी विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.सात जुलै रोजी दुपारी तीनच्या ठोक्यालाच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली तर अस्थायी विक्रेते तथा फेरीवाल्यांनी आपल्या लोटगाडीसह घराचा रस्ता धरला होता. बुलडाणा शहरातील काही भागात तीन ऐवजी सव्वातीनच्या सुमारास काहींनी दुकाने बंद केली. मात्र या लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत आपले दैनंदिन व्यवहार तीनच्या ठोक्याला बंद केल्याचे चित्र दिसले. पोलिस प्रशासनानेही बुलडाणा शहरातील मुख्य चौकात पोलिसांची लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियुक्ती केली असून पोलिसांच्या वाहनानेही नागरिकांना त्वरित दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.फिजिकल डिस्टन्सिंगकडे केले जातेय दुर्लक्षजिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाला असला तरी सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत आत्यावश्यक सेवा आणि दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. पण या कालावधीत बुलडाणा शहरात नागरिकांकडून शारीरिक अंतर ठेवून आपली कामे उरकरण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले असले तरी नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे राज्यात अन्यत्र यासाठी वापरण्यात आलेल्या छत्री पॅटर्नचाही वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र त्याकडेही जिल्हास्तरावरील या लॉकडाऊन दरम्यान, अनेकांनी दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले.
लॉकडाऊन मलकापूर, नांदुरा, मोताळ््यातही लागूमलकापूर, मोताळा आणि नांदुºयात आधीपासूनच लॉकडाऊन सुरू आहे. तेथील लॉकडाऊन १५ जुलै रोजी संपणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यात २१ जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या तीनही तालुक्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर तेथेही हा लॉकडाऊन राहील.