Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात तरुणाईची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:48 PM2019-04-03T15:48:21+5:302019-04-03T15:48:32+5:30

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची असून २० ते २९ वयोगटातील तीन लाख ६२ हजार आणि ३० ते ३९ वयोगटातील चार लाख १८ हजार ६५ मतदार बुलडाणा लोकसभा मतदार संघात असून राजकीय दृष्ट्या उपरोक्त वयोगट सक्रीय असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये या वयोगाटीतील व्यक्तींची भूमिका महत्त्वाची प्रसंगी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2019: Role of youth in Buldhana constituency is important | Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात तरुणाईची भूमिका महत्त्वाची

Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात तरुणाईची भूमिका महत्त्वाची

Next

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची असून २० ते २९ वयोगटातील तीन लाख ६२ हजार आणि ३० ते ३९ वयोगटातील चार लाख १८ हजार ६५ मतदार बुलडाणा लोकसभा मतदार संघात असून राजकीय दृष्ट्या उपरोक्त वयोगट सक्रीय असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये या वयोगाटीतील व्यक्तींची भूमिका महत्त्वाची प्रसंगी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात शेती, सिंचन, पाणीप्रश्नासोबतच बेरोजगारीचाही प्रश्न आहे. त्यामुळे उपरोक्त वयोगाटातील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील एकंदरीत वयोगटाचा विचार करता ५० वर्षाच्या आतील मतदारांची संख्या ६८ टक्के अर्थात ११ लाख ७८ हजार ३०६ मतदार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने हा वर्ग मतदान प्रक्रियेत कोणती भूमिका बजावतो यावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
मध्यंतरी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार बुलडाणा जिल्ह्यात १७ लाख ४५ हजार ८३४ मतदार आहेत. यामध्ये आठ तृतियपंथीयांचाही समावेश आहे. दरम्यान, महिला मतदारांची संख्या ही आठ लाख ३० हजार २७५ असून पुरुष मतदारांची संख्या नऊ लाख १५ हजार ५४३ आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ लाख ९१ हजार ७७६ मतदार होते. त्या तुलनेत २०१९ मध्ये एक लाख ५४ हजार ५८ मतदार जिल्हयात वाढले असून हे नवमतदार ही निवडणुकीचा रंग बदलवण्याची क्षमता ठेवून आहेत. दम्यान जवळपास आठ वयोगटातील मतदारांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ््या अपेक्षा आहेत.
त्यावर उमेदवार कितपत खरे उतरतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे उमेदवार या मतदारांना कितपत आपलेसे करतात हा उत्सूकतेचा विषय ठरणार असून तरुणाई कोणाचे पारड्यात कौल देते हे उत्सूकतेचे ठरले आहे.
३४ हजार मतदार करणार प्रथमच मतदान
लोकसभा निवडणुकीमध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघाचा विचार करता ३४ हजार ३६८ नव मतदार असून असून प्रथमच मतदान करणार आहेत. यामध्ये २२ हजार १४६ पुरुष तर १२ हजार २२२ युवतींचा समावेश असून १८ ते १९ वयोगटातील हे नवमतदार आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019: Role of youth in Buldhana constituency is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.