शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 2:44 PM

लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देसरोवरातील पाण्याने गत १८ वर्षातील सर्वात कमी पातळी गाठली आहे. सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली.नैसर्गिक झरे बंद पडल्यामुळे लोणारच्या अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे.

- रहेमान नवरंगाबादी लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे. सरोवरातील पाण्याने गत १८ वर्षातील सर्वात कमी पातळी गाठली आहे. पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली.लोणार सरोवरावरील संकटे थांबण्याची चिन्हे नाहीत. सरोवराला येऊन मिळणारे पाचपैकी दोन प्रमुख नैसर्गिक झरे बंद पडल्यामुळे लोणारच्या अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे. लोणारच्या झऱ्यांचा स्रोत असणाºया भूजलाचा बेकायदा उपसा सुरू असल्यामुळे ही स्थिती उदभवल्याचे समोर येत आहे. उपग्रहीय छायाचित्रे आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे केलेल्या पाहणीतून २०१४ च्या तुलनेत लोणार सरोवराचे पाणी पसरट भागात तब्बल २०० ते ३०० मीटरने मागे गेले आहे. गेल्या दोन वर्षांत कमी पाऊस झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्ष पावसाच्या आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे. २००१ ते २०१६ या कालावधीत लोणारच्या पावसात कोणताही बदल झालेला नसल्याचे राज्य सरकारच्या पावसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गेल्या सोळा वर्षांपैकी २००३ मध्ये ४८४ मिलीमीटर तर २००४ मध्ये ४७३.७ मिलीमीटर हा सर्वात कमी पाऊस लोणारमध्ये नोंदवला गेला होता. मात्र, त्या दोन्ही वर्षी लोणार सरोवराचे पाणी सर्वोच्च पातळीवर होते. गेल्या तीन वर्षांत लोणारमध्ये ५१० मिलीमीटर (२०१४), ५४६ मिलीमीटर (२०१५) आणि ७९४ मिलीमीटर (२०१६) पावसाची नोंद झाली. लोणारच्या सरासरी पावसापेक्षा हा पाऊस जास्त आहे. तरीही लोणार सरोवराचे पाणी सर्वांत कमी पातळीवर पोचले आहे. सतत तीन वर्षापासून दुष्काळाची परिस्थिती निर्माण असल्यामुळे जमिनीवरील पाणी आटत आहे. त्याचाही परिणाम दिसून येत आहे.१९७२ च्या दुष्काळात आटले होते पाणी१९७२ च्या दुष्काळामध्ये निसर्गनिर्मित जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे खारे पाणी पूर्णपणे आटले होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी सरोवरातील तयार होणारा खार आणून विक्री केला होता. आता तशी परिस्थिती निर्माण होते की काय, असा प्रश्न सरोवर प्रेमी करीत आहे. सरोवराला येऊन मिळणारे नैसर्गिक सर्व झरे आटल्याने पाणीसाठा घटत चालला आहे. ही बाब गंभीर असून सरोवराच्या अस्तित्वावर परिणाम झाला आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाLonarलोणार