लोणार सरोवर परिसर बनला मद्यपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:05+5:302021-06-02T04:26:05+5:30
माणसांचे लसीकरण लांबले, जनावरांचेही लटकले बुलडाणा : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, ...
माणसांचे लसीकरण लांबले, जनावरांचेही लटकले
बुलडाणा : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यात हे लसीकरण केले जाते. गेल्यावर्षी उशीर झाला आणि आता पुन्हा हे लसीकरण लटकले आहे़
रेती वाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था
देऊळगाव मही : डिग्रस बु. परिसरात रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. डिग्रस बु. पासून पाबळपर्यंत रस्त्यावरील डांबर उखडले आहे. या रस्त्यावर सतत रेतीची टिप्परद्वारे वाहतूक होत आहे. रस्त्याची क्षमता कमी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक दररोज होते. अंदाजे २५ ते ३० टनपेक्षा जास्त भरलेले रेती टिपर दररोज शेकडोच्या संख्येत वाहतूक करतात.
ग्रामीण भागात नालेसफाईला वेग
मेहकर : ग्रामपंचायतीच्यावतीने मान्सूनपूर्व नाल्यांच्या सफाईचे काम सध्या वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे नियोजन दिसून येत आहे.
बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक
हिवरा आश्रम : खरीप हंगाम जवळ आला आहे. मेहकर तालुक्यात सोयाबीन या पिकाचा पेरा जास्त असतो. शेतकरी घरचेच बियाणे जास्त प्रमाणात वापरतात. मात्र हे बियाणे पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणे महत्त्वाचे असते. याकरिता कृषी सहायकांकडून उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले आहे.
नियमांमुळे रोखता येईल तिसरी लाट
बुलडाणा : वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आता तिसरी लाट येणार असल्याने अनेकांनी धास्ती धरली आहे. परंतु प्रत्येकाने नियमांचे पालन केले, कोरोनाची त्रिसूत्री पाळली, तर ही तिसरी लाट रोखता येऊ शकते, असे आरोग्य विभागाचे मत आहे.
शाळा सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
बुलडाणा : सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्णांची संख्या कमी हाेत आहे़ लसीकरणाचा वेग वाढवल्यास शाळा सुरू करणे शक्य हाेणार आहे़ दाेन वर्षांपासून घरातच असलेल्या मुलांना शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे़
महागाईमुळे शेतीकामे अडचणीत
दुसरबीड: शेतकऱ्यांची आता पूर्वहंगामी शेती मशागतीची कामे सुरू आहेत. परंतु महागाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने नांगरणी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या मशागतीकरिता बैलजोडी वापरणे शक्य नसल्याचे चित्र आहे़
खंडित वीज पुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
मलकापूर पांग्रा : येथील महावितरणचे ३३ केव्ही सबस्टेशन असले, तरी खासगी आणि कंत्राटी कामगारच येथील कारभार पाहतात. या गावात कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे गावकऱ्यांना वर्गणी करून खासगी लाइनमनकडून वीज पुरवठ्याची कामे करून घ्यावी लागत आहेत.
सातबारावर बोजा असल्याने अडचणी
हिवरा आश्रम: पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर खासगी वित्तीय संस्थांचा बोजा असल्याचे कारण सांगून त्यांना पीक कर्जापासून रोखण्यात येेते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पीक कर्जापासून वंचित राहतो की काय, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
वर्षभरात ३२ बालविवाह रोखले
बुलडाणा: गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३२ बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आले आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला तरी, जिल्ह्यात होणारे बालविवाह चिंताजनक आहे.
२७ रस्ते कामाची प्रतीक्षा
बुलडाणा: तालुक्यात ४० पैकी १३ पाणंद रस्त्यांचे काम झालेले आहे. उर्वरित २७ रस्ते कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणंद रस्त्याच्या कामासाठी एक किलोमीटरमागे साधारणत: ५० हजार रुपयांचा खर्च येतो.
बुरशीनाशक कल्चर यंत्र धूळ खात
बुलडाणा: निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागतो. त्यात बुरशीनाशक कल्चर मशीन हेसुद्धा टेक्निशियनअभावी वापरले जात नाही आणि ही यंत्रणा धूळ खात पडली आहे.