प्राणवायू निर्मितीमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण बनवणार - शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:03+5:302021-05-16T04:34:03+5:30

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रिय रुग्णांच्या प्राणवायूची वाढती गरज पाहता, जिल्ह्याला प्राणवायू निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात येत ...

To make the district self-sufficient in oxygen generation - Shingane | प्राणवायू निर्मितीमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण बनवणार - शिंगणे

प्राणवायू निर्मितीमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण बनवणार - शिंगणे

Next

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रिय रुग्णांच्या प्राणवायूची वाढती गरज पाहता, जिल्ह्याला प्राणवायू निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. प्राधान्याने जिल्ह्याला याबाबत स्वयंपूर्ण बनविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. दुसऱ्या जिल्ह्यावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत, असे सांगितले.

बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती प्रकल्प १५ मे रोजी त्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, डॉ. सचिन वासेकर उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. आता या प्रकल्पाव्दारे ८० जम्बो सिलिंडर इतका हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटमधूनच रुग्णांच्या बेडला प्राणवायू नलिका जोडून तो पुरविण्यात येणार आहे. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वयंपूर्ण होत असताना, बुलडाणा जिल्हादेखील सर्वार्थाने स्वयंपूर्ण करणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: To make the district self-sufficient in oxygen generation - Shingane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.