देऊळगाव राजा येथे मलेरिया जनजागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:43+5:302021-06-20T04:23:43+5:30

हे अभियान वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसमा शाईन, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. ...

Malaria Awareness Program at Deulgaon Raja | देऊळगाव राजा येथे मलेरिया जनजागृती कार्यक्रम

देऊळगाव राजा येथे मलेरिया जनजागृती कार्यक्रम

Next

हे अभियान वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसमा शाईन, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. मोहिमेत आरोग्यविषयक हस्तपत्रिकेचे वाटप करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, पाणीसाठा घट्ट झाकून ठेवावा, टायर, नारळाच्या करवंट्या, भंगार सामान व इतर सामान नष्ट करावे, पाणी साठलेल्या भांड्यात डासअळ्या होऊ न देणे, तसेच कंटेनर सर्वेक्षणही करण्यात आले. यावेळी डॉ. राजमाने, राजेश काकड आदी कर्मचारी उपस्थित होते. तीव्र स्वरूपाचा ताप, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे, कानांतून, नाकातून, हिरड्यांतून रक्तस्राव होणे आदी लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसमा शाहीन व जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज सिंग चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Malaria Awareness Program at Deulgaon Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.