मलकापूरः शहरात चार तर तालुक्यातील धरणगांवात एक असे पाच रुग्ण रविवारी उशिरा रात्री आढळून आले आहेत. त्यामुळे मलकापूर परिसरात गेल्या पाच दिवसात कोरोना बाधीतांची संख्या १२ वर पोहचली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,मलकापूर परिसरात सर्व प्रथम चार जण कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतरच्या काळात नरवेल येथील चिमुकली कोरोना बाधित आढळून आली. सर्वांवर उपचार झाले. आणी ते रुग्ण निगेटिव्ह होवून स्वगृही परतले.त्यामुळे मलकापूर परिसरात परिस्थिती पूर्णपदावर आली होती. असे असताना दि.२८ व दि.२९ अशा दोन दिवसात ७ जण कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे प्रशासनाने आधी भिमनगर त्या नंतर बुलढाणा रस्त्यावर मर्यादित क्षेत्रात एरिया सिल करण्यात आले.असे असतांना रविवारी उशिरा रात्री शहरातील चार तर तालुक्यातील मौजे धरणगांवात एक असे पाच रुग्ण आढळून आले. या माहीतीस उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान आता मलकापूर परिसरात गेल्या पाच दिवसात कोरोना बाधितांची संख्या १२ वर पोहचली आहे.अनेकांना काँरंटीन करण्यात आले आहे.त्यामुळे कोरोना संसर्गाची धास्ती नागरिकांमध्ये वाढली आहे.अर्थात त्या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने शर्थीचे उपचार सुरू आहेत. शिवाय १२ पैकी अनेकांची कोरोना संसर्गाविषयीची लक्षणे साधारण असल्याने ते निगेटिव्ह होवून स्वगृही परततील असा आशावाद आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनीधी)
मलकापूरः पाच दिवसात शहर व तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 9:57 AM