मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० जखमी झाल्याची घटना येथून नजीकच राष्ट्रीय महामार्ग ६ वरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ डिसेंबररोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरूष, दोन महिला व सात शाळकरी विद्यार्थीनींचा समावेश आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाची बस क्र.एमएच.४०-एन ८७७५ मौजे वाघोळ्यावरून मलकापूर येण्यासाठी निघाली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारस राष्ट्रीय महामार्गावरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रक क्र.एमपी४४ एचए०४६५ ने बसला जबर धडक दिली. त्यात देवीदास फकीरा लहासे (वय ३९), सविता उत्तम पाचपोळ (वय ४०) रा. वाघोळा, दुर्गाअशोक काचकुटे (य २२) रा. तांदुळवाडी, रोशनी शंकर सरदार (वय १४), साक्षी सुरेश अहीर (वय १२), कल्याणी प्रकाश अहिर (वय१३), श्तिल गणेश घुगरे (वय १४), अंकिता सुरेश लोणकर (वय १४), सरस्वती दत्तात्रय वसने (वय १४), संजीवनी अशोक घाईट (वय १४) सर्व रा. वाघोळा आदी जखमी झाले. जखमीवर मलकापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात जखमीवर उपचार करण्यात आले. आगार प्रमुख दराडे ह्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून राज्य परिवहन महामंडळाचेवतीने निर्धारीत मदत दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)