बुलढाणा: अल्पसंख्याक समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच, बुलडाणा शाखेतर्फे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धरणे देण्यात आले.
या आंदोलनात बुलडाणा जिल्ह्यातील हजारो मुस्लिम राजकीय, सामाजिक, शैक्षणिक लोक व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेवटी जिल्हाधिकार्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले, यामध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे. केंद्र आणि राज्य सरकारने मुस्लिमांच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करावी. पंतप्रधानांचा १५कलमी कार्यक्रम लवकरात लवकर लागू करावा. मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.
मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह स्थापन करावे. राज्यातील वक्फ मालमत्तेचा वापर मुस्लिमांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी केला जावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजातील माबलिंचींग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत. मौलाना आझाद शैक्षणीक व आर्थिक विकास महामंडळ यांचे कर्ज १० लाखांपर्यंत मर्यादित असावे. बेरोजगार तरुणांना थेट कर्ज मिळावे. नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या सीबीएसई निवासी शाळा स्थापन कराव्यात.बार्टी प्रमाणे मार्टी कायम करण्यात यावा. यासह आदी मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात हाजी मुझमल खान यांनी शेकडो लोक जोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला.विशेष मुस्लिम धर्म गुरूंची उपस्थिती लक्षणीय होती ज्यात मौलाना अकबर साहब, मौलाना खलील साहब, मौलाना ईनायत साहब, मौलाना सनाऊल्ला साहब, आणि जिल्हाभरातील मुस्लिम नेते, हाजी मुज़म्मिल अली खान, हाजी रशीद खान जमादार,एड.नाझेर काज़ी,अताऊलला खान सर, बाबु जमादार, वासिक नवेद आदींचा सहभाग होता. या आंदोलनाला जिल्हा उर्दू शिक्षक संघ, मुस्लिम आरक्षण समितीने समर्थन दिले.