बाजार समिती आवारातील पोस्ट ऑफिसचे मुख्य शाखेत विलीनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:45+5:302021-09-07T04:41:45+5:30

उत्पन्न कमी असणाऱ्या पोस्टाच्या अनेक शाखा बंद करून तेथील साधनसामुग्री इतरत्र हलविण्यात येते. त्यानुसार बाजार समितीच्या आवारात अनेक वर्षांपासून ...

Merger of the post office in the Market Committee premises into the main branch | बाजार समिती आवारातील पोस्ट ऑफिसचे मुख्य शाखेत विलीनीकरण

बाजार समिती आवारातील पोस्ट ऑफिसचे मुख्य शाखेत विलीनीकरण

Next

उत्पन्न कमी असणाऱ्या पोस्टाच्या अनेक शाखा बंद करून तेथील साधनसामुग्री इतरत्र हलविण्यात येते. त्यानुसार बाजार समितीच्या आवारात अनेक वर्षांपासून चिखलीकरांच्या सेवेत असलेल्या पोस्टाच्या या शाखेचा विलीनीकरणाचा निर्णय हा खात्यांतर्गत घेण्यात आला आलेला आहे. या शाखेतील सुमारे ४ हजार विविध प्रकारची खाती चिखली मुख्य कार्यालयात स्थलांतरित करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य पोस्ट ऑफिसचे अधिकारी कळमस्कर यांनी दिली आहे.

मुख्य शाखेत गर्दी वाढणार

शाखेच्या विलीनीकरणाचा निर्णय हा खात्यांतर्गत असला तरी त्याचा फटका अनेक चिखलीकरांना बसणार आहे. तसेच मुख्य शाखेत कायम गर्दी असते. त्यात आता आणखी चार हजार खात्यांचा भार वाढणार असल्याने तेथे तासन्तास लाईनमध्ये उभे राहावे लागणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Merger of the post office in the Market Committee premises into the main branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.