नुकसानग्रस्त शेतीची महसूल राज्यमंत्री करणार पाहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:47+5:302021-09-14T04:40:47+5:30
बुलडाणा: गत काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूल, ग्रामविकास, ...
बुलडाणा: गत काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास विशेष सहाय व बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे १३ व १४ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
१३ सप्टेंबर रोजी सेनाभवन, सिल्लोड, जि. औरंगाबाद येथून धाड, ता. बुलडाणाकडे सायंकाळी ५ वाजता मोटारीने प्रयाण करणार आहेत़ १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सागवण, कोलवड, ता. बुलडाणा, दुपारी १२.१० वाजता पाडळी, ता. बुलडाणा, दु. १२.५० वाजता रोहिनखेड, ता. मोताळा, दु. १.२० वा. वडगाव खंडोपंत, ता. मोताळा, दु. १.५० वा. अंत्री, बोराखेडी, ता. मोताळा येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत़