ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नवतंत्रज्ञानाच्या युगात शेतीत होणारे वेगवेगळे बदल व उत्पन्न वाढीसाठी शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने शेती संबंधित १८ मोबाइल अँप तयार केलेले आहेत. मोबाइल अँपच्या माध्यमातून शेतकर्यांना वेळोवेळी कृषी सल्ला दिल्या जात असल्याने कृषी विभागाचे विविध मोबाइल अँप शेतात राबणार्या बळीराजाचा सोबती ठरत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात झालेल्या बदलाचा स्वीकार शेतकर्यांनी केला असून, शेतीसाठी विविध यांत्रिक उपकरणांचा वापरही शेतकरी करीत आहेत; परंतु हवामाना तील अचानक होणारे बदल, पिकांवर पडणार्या कीड व रोगांवरील उपाययोजना, िपकांच्या विविध जाती, पीक विमा योजना बाजार भाव यांसारख्या विविध माहितीचा अभाव शेतकर्यांना असतो. तसेच उत्पादनवाढीसाठी शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असते; या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेती संबंधित १८ मोबाइल अँप तयार केले आहेत.ग्रामीण भागात वाढती मोबाइल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाइल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाइल अँपच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी कृषी विभागाने टाकलेले हे पाऊल शेतकर्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. शेतकर्यांकडून शेती संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोबाइल अँपचा वापर वाढला असून, सद्यस्थितीत विकसित अशा मोबाइल अँपद्वारे युवा शेतकरी कृषी विभागाचा सल्ला घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. शेतीमध्ये सर्वाधिक फटका बसतो तो हवामानातील अचानक होणार्या बदलांचा. त्यावर मात करण्यासाठीही मोबाइल अँप शेतकर्यांसाठी फायद्याचे ठरत आहे. शे तकर्यांना हवामान आणि त्यावर आधारीत कृषी, फळबाग आणि पशुपालन सल्ला मोबाईल अँपद्वारे मिळत आहे. कृषी विभागाच्या मोबाईल अँपमुळे शेतकर्यांना पिकांचे नियोजन करण्यास आणि पीक वाचविण्यास सोईचे होत आहे.
हे आहेत कृषी विभागाचे अँपशेती संबंधित माहिती देण्यासाठी कृषी विभागाने वेगवेगळे मोबाईल अँप तयार केले आहेत. त्यामध्ये महारेन, क्रॉप क्लिनिक, कृषि मित्र, एम.किसान भारत, किसान सुविधा, पुसा कृषि, क्रॉप इनशुरन्स, डिजीटल मंडी भारत, अँग्री मार्केट, पशु पोषण, कॉटन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हळद लागवड, पीक पोषण, लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड, शेकरू, इफ्को किसान आदी मोबाईल अँपद्वारे शेतकरी कृषी विभागाचा सल्ला घेत आहेत.
अँपद्वारे मिळते ही माहितीकृषी विभागाच्या मोबाईल अँपद्वारे मंडळ, तालुका जिल्हा विभाग स्तरावरील आजचा व सर्वसाधारण पाऊस, सोयाबीन, कापूस भात तूर व हरभरा या पाच िपकांच्या किडी व रोगावर उपाययोजना, तालुक्यातील खत-बियाणे औषधी विक्रे त्यांची माहिती, कृषी हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले, हवामान, कृषी निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, शे तमालाचे दर, जनावराचे आहार विषयक मार्गदर्शन, कापूस लागवड तंत्रज्ञान, फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती, विविध कृषी योजना व प्रशिक्षण यासह अनेक विषयांवर माहिती मिळत आहे.
शेती संबंधित कृषी विभागाच्या वेगवेगळ्या मोबाईल अँपचा शेती करताना चांगला उपयोग होत आहे. शेतीत होणारे बदल व नवतंत्रज्ञानाची ओळख अँपद्वारे झाली असून, नेटशेडसाठी व विविध प्रकारची माहिती कृषी विभागाच्या मोबाईल अँपद्वारे घेऊन त्याचा शेतीसाठी पुरेपुर वापर करतो. - नितीन भिकनराव देशमुख, युवा शेतकरी, ऊमरा दे. ता.मेहकर.-