दादगाव ते भाेटा रस्त्यावर साचला चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:39+5:302021-07-29T04:33:39+5:30
गर्भवती महिलेचा वाटेतच मृत्यू बुलडाणा : प्रसूतीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून अकाेला येथे हलवताना बाळासह आईचा मृत्यू झाला. ही ...
गर्भवती महिलेचा वाटेतच मृत्यू
बुलडाणा : प्रसूतीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून अकाेला येथे हलवताना बाळासह आईचा मृत्यू झाला. ही घटना २६ जुलै राेजी घडली. उबाळखेड येथील अनिता संताेष भेंडे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले हाेते. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णवाहिकेने अकाेला येथे हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
विठ्ठल-रुक्मिणीचरणी चांदीचा मुकुट अर्पण
किनगाव राजा : येथील पौरोहित्य कार्य करणारे चंद्रकांत कुलकर्णी यांनी किनगाव राजा येथील सुवर्ण व्यावसायिक सिद्धराज वाळेकर यांच्या सहकार्याने येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीस आषाढी एकादशीच्या निमित्ताने चांदीचे मुकुट अर्पण केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी या पूर्वीही याच मंदिरात दान दिले आहे.
अजिजपूर येथे वृक्षाराेपण
बुलडाणा : कोरोना महामारीच्या दुसऱ्या व संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्याकरिता जाणीव जागृती व्हावी या अनुषंगाने १५ ते ३० जुलै या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्याचे करण्यात आले आहे. या पंधरवड्यानिमित्ताने २६ जुलै रोजी स्वच्छता पंधरवड्यातील दहाव्या दिवशी अजिजपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
काेलवडजवळ अपघात; दाेन जण जखमी
बुलडाणा : धाड मार्गावरील कोलवड गावाजवळ असलेल्या पेट्रोलपंपाजवळ दुचाकी व जेसीबीची धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज २७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. नांद्राकोळी येथील रहिवासी गौरव पंजाबराव सोनवणे व मंगेश संजय जाधव हे दोघे जण दुचाकीने धाडकडून बुलडाण्याकडे येत असताना कोलवडजवळील पेट्रोलपंपानजीक दुचाकी व जेसीबीची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
युवकांनी शिक्षणात प्रगती करावी
देऊळगाव मही : कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षापासून सातत्याने असंख्य युवकांना नोकरी सोडावी लागली. विविध उद्योगधंदे या कोरोनामुळे बंद पडले. त्यामुळे युवकांची शिक्षण क्षेत्रात मोठी हानी झाली. मात्र या संकटावर मात करून युवकांनी न खचता शिक्षण क्षेत्रात प्रगती करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले.