पावसाळ्यात निम्या योजना बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:12 AM2017-09-27T00:12:01+5:302017-09-27T00:12:12+5:30
नांदुरा: तालुक्यातील ६५ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींची पाणीपट्टी वसुली थकीत असून, पाणीपुरवठा योजनांचे २ कोटींच्या वर वीज बिल रखडले आहे. परिणामी, तालुक्यातील निम्या पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज वितरणने खंडित केला असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
संदीप गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: तालुक्यातील ६५ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींची पाणीपट्टी वसुली थकीत असून, पाणीपुरवठा योजनांचे २ कोटींच्या वर वीज बिल रखडले आहे. परिणामी, तालुक्यातील निम्या पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज वितरणने खंडित केला असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
गावामधील पाणीपट्टी वसुली करून त्यामधून पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाचा भरणा करण्यात येतो; परंतु ग्रा.पं. स् तरावर वसुली करण्याकडे शासन व प्रशासन अकार्यक्षम असल्याचे तालुक्यातील मोठय़ा प्रमाणात थकीत पाणीपट्टी, घर पट्टी व इतर करांवरून दिसून येते. काही ग्रामपंचायतींनी तीन ते चार वर्षांपासून वीज बिल भरलेच नसल्याने त्यांच्याकडे थकबाकी वाढली आहे. आता वीज वितरणने घेतलेल्या भूमिकेमुळे या ग्रामपंचायती वीज बिल भरण्यास असर्मथ आहेत. हे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे चार ते पाच वर्षांपासून पाणी पुरवठा कर वसुली झाली असूनही वसुलीच्या प्रमाणात वीज बिल भरले नसल्यानेच आज ग्रा.पं.वर वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे. आता काही ग्रामपंचायतींमध्ये तर वीज बिल जास्त व त्याहीपेक्षा कमी पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे आतापर्यंत वसूल झालेली कराची रक्कम कोठे खर्च झाली, हे अद्याप कोडेच आहे.