मुलाला हळद लावतानाच आईने घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:45 AM2018-03-07T00:45:56+5:302018-03-07T00:45:56+5:30

मुलाला हळद लागल्याने लग्न समारंभ उकरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आईचे निधन झाल्याची माहिती नवरदेवापासून गुप्त ठेवली. दुसºया दिवशी विवाह समारंभ आटोपल्यानंतर नवरदेवाला याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर मुलाने आईचे अंत्यसंस्कार पार पाडले. नियती किती क्रुर असते याचे पुन्हा प्रत्यंतर यानिमित्ताने सर्वांना आले.

The mother took the message of the world when the child took turmeric | मुलाला हळद लावतानाच आईने घेतला जगाचा निरोप

मुलाला हळद लावतानाच आईने घेतला जगाचा निरोप

googlenewsNext
ठळक मुद्दे लग्नसमारंभानंतर मुलाने पार पाडले अंत्यसंस्कार

नानासाहेब कांडलकर। 
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : मुलाच्या लग्न समारंभाची घरात लगबग नवरदेवाला हळद लावण्याचा धार्मिक विधी सुरू, घरात आनंदाचे वातावरण. सर्व नातेवाईकांच्या व स्नेहीजणांच्या उपस्थितीत हळदीचा विधी सुरू असतानाच नवरदेवाच्या आईची अचानक प्रकृती बिघडते. आणि दवाखान्यात नेल्यानंतर आईने जगाचा निरोप घेतल्याचे वास्तव समोर येते. कोणालाच काय करावे सुचत नाही. मुलाला हळद लागल्याने लग्न समारंभ उकरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आईचे निधन झाल्याची माहिती नवरदेवापासून गुप्त ठेवली. दुसºया दिवशी विवाह समारंभ आटोपल्यानंतर नवरदेवाला याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर मुलाने आईचे अंत्यसंस्कार पार पाडले. नियती किती क्रुर असते याचे पुन्हा प्रत्यंतर यानिमित्ताने सर्वांना आले.
तालुक्यातील झाडेगाव येथील अंत:करण हेलावून सोडणारी ही घटना. गोपाळराव व रूख्माबाई ठाकरे यांचे चिरंजीव दामोधर यांचा विवाह तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील वसंतराव कुटाळे यांची कन्या रूचिता हिचेशी सोमवार ५ मार्च रोजी आदर्श पध्दतीने वधुपित्याकडे करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने रविवार ४ मार्च रोजी झाडेगाव येथे नवरदेव मुलाला हळद लावण्याचा धार्मिक विधी दुपारी सुरू होता. 
घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते आणि अचानक नवरदेवाची आई रूख्माबाई यांच्या छातीत दुखायला लागले. प्रथम खांडवी येथे व नंतर नांदुरा येथे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु त्या आधीच रूख्माबाईने जगाचा निरोप घेतला होता.
नवरदेव व नवरीला हळद लागलेली काय करावे हे सुचेना. शेवटी निर्णय घेण्यात आला. मुलाला व कुटुंबियांना आईची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आईच्या पार्थिवाला रविवारची अख्खी रात्र व सोमवारी दुपारपर्यंत निमगाव येथे शेवपेटीत ठेवण्यात आले. 
सोमवारी काही मोजके वºहाडी नवरदेवासोबत खापरखेड येथे जावून विवाह समारंभ थोडक्यात आटोपून आले आणि त्यानंतर आई रूख्माबाईचे पार्थिव झाडेगाव येथे नेण्यात आले. 
 

Web Title: The mother took the message of the world when the child took turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.